पुणे: पोलिसांकडून मागील पाच महिन्यात कोकेनचे 4 गुन्हे दाखल झाले. यात 198 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले असून यात 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर गांजाच्या बाबतीत 18 गुन्हे दाखल झाले असून जवळपास 184 किलो गांजा जप्त केला गेला. यात 21 आरोपींना अटक करण्यात आली आहे. ब्राऊन शुगर / हेरॉईनचा एक गुन्हा दाखल झाला. 336 ग्रॅम ब्राऊन शुगर / हेरॉईन जप्त करण्यात आली. यात एका आरोपीला अटक करण्यात आली. हेरॉईनची किंमत ही 4 लाख 33 हजार 200 रुपये एवढी आहे. कारवाई दरम्यान अफिमचे बोंडे / दोडाचुरा 5 किलो जप्त करण्यात आले आहे. या घटनेत एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
एवढे ड्रग्ज जप्त:चरस बाळगण्याचे एकूण 4 गुन्हे दाखल झाले असून तब्बल 3 किलो 285 ग्रॅम चरस जप्त करण्यात आले आहे. तर यात 6 आरोपींना अटक करण्यात आली. जप्त चरसची किंमत जवळपास 42 लाख 68 हजार 940 एवढी आहे. तसेच मेफेड्रोनचे (एम.डी.) 17 गुन्हे दाखल झाले असून जवळपास 1 किलो 717 ग्रॅम एम. डी. जप्त करण्यात आले. यात 25 आरोपींना अटक करण्यात आली आहे. याची साधारणतः किंमत ही 3 कोटी 43 लाख 79 हजार 400 रुपये इतकी आहे. एल.एस.डी. बाबत एक गुन्हा दाखल केला गेला. यात 9 मिलिग्रॅम एल.एस.डी. ताब्यात घेण्यात आले. यात एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. एम.डी.एम.ए. बाबत एक गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी 13 ग्रॅम एम.डी.एम.ए जप्त केले. याप्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. कॅथा इडुलिस (खत) बाबत 2 आरोपींना अटक केली गेली.