जुन्नर(पुणे)-तालुक्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरुर तालुक्यातून टोमॅटोची सर्वाधिक आवक होत आहे. यामुळे लॉकडाऊनमध्येही सोशल डिस्टन्सिंग व इतर नियमांचे पालन करत जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे नारायणगाव टोमॅटो व भाजीपाला मार्केट आजपासुन सुरू राहणार असल्याची माहिती सभापती संजय काळे यांनी दिली.
नारायणगाव उपबाजार केंद्रात जुन्नर, आंबेगाव, खेड, तालुक्यातून टोमॅटो विक्रीसाठी येत असतात. सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये पणन महामंडळ व राज्य शासनाने शेतीमालावर खरेदी विक्रीकर बंदी घातली नसल्याने शेती मालाची आवक-जावक सुरू ठेवण्यात आली आहे.