महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

..म्हणून नारायणगाव बाह्यवळणाचे काम ग्रामस्थांनी पाडले बंद

पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगाव बाह्यवळणला, पूर्व भागाच्या गावातील नागरिकांना येण्या-जाण्यासाठी पुल किंवा भुयारी मार्ग करण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. मात्र स्थानिकांच्या या मागणीकडे दुर्लक्ष करुन बायपासचे काम युद्धपातळीवर सुरु होते. तेव्हा आज दुपारी (शनिवार) नागरिकांनी नारायणराव बाह्यवळणचे काम बंद पाडले.

Narayangaon bypass work stopped by villagers
...म्हणून नारायणगाव बाह्यवळणाचे काम ग्रामस्थानी पाडले बंद

By

Published : Aug 22, 2020, 9:33 PM IST

नारायणगाव (पुणे) - पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगाव बाह्यवळणला, पूर्व भागाच्या गावातील नागरिकांना येण्या-जाण्यासाठी पुल किंवा भुयारी मार्ग करण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. मात्र स्थानिकांच्या या मागणीकडे दुर्लक्ष करुन बायपासचे काम युद्धपातळीवर सुरु होते. तेव्हा आज दुपारी (शनिवार) नागरिकांनी नारायणराव बाह्यवळणचे काम बंद पाडले. बाह्यवळणला पर्यायी मार्ग म्हणून पुल किंवा भुयारी मार्ग होत नाही, तोपर्यत बाह्यवळणचे काम होऊ देणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.

पुणे-नाशिक महामार्गावर प्रमुख शहरामध्ये होणा-या वाहतुक कोंडीला पर्याय म्हणून बायपास मार्ग करण्यात येत आहे. मात्र बाह्यवळण करत असताना आजूबाजूला असणाऱ्या गावांच्या वाहतुकीचा विचार न करताच हे काम केले जात आहे. मागील तीन वर्षांपासून नारायणगावाशी निगडित असणा-या आठ गावांतील नागरीक बाह्यवळणला पुल किंवा भुयारी मार्ग करण्यात यावा, यासाठी लढा देत आहेत.

नामदेव खैरे बोलताना...

मात्र जिल्हा प्रशासन व संबधित ठेकेदार यांचा मनमानी कारभार सुरु असल्याने स्थानिक नागरिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे बायपास लगतच्या आठ गावांतील नागरिकांनी एकत्र येऊन बाह्यवळणचे काम बंद पाडले. नारायणगाव बाह्यवळणला पुल किंवा भुयारी मार्ग जोपर्यंत होत नाही तो पर्यत बाह्यवळणचे काम करु देणार नसल्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

हेही वाचा -अनावधानाने झालेल्या 'त्या' चुकीबद्दल प्रवीण तरडेंनी मागितली जाहीर माफी

हेही वाचा -श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर पोलीस दलातील श्वान नतमस्तक, पाहा व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details