पुणे -कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नारायणगाव पोलीस, आरोग्य विभाग, वारुळवाडी ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून जनजागृतीसाठी पथसंचलन करण्यात आले. या पथसंचलनातील दुचाकींमध्ये सोशल डिस्टन्स ठेवून नागरिकांना प्रशासनाचे अनुकरण करण्याचे आवाहन करण्यात आले.
नारायणगाव पोलिसांचे पथसंचलन; प्रशासनाला सहकार्य करण्याचे केले आवाहन - नारायणगाव लॉकडाऊन
देशावर कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत असताना लॉकडाऊन कडक करण्यात आला आहे. नागरिकांनी कोरोनावर घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात येत आहे. नारायणगाव पोलीस, आरोग्य विभाग, वारुळवाडी ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून जनजागृतीसाठी पथसंचलन करण्यात आले.
देशावर कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत असताना लॉकडाऊन कडक करण्यात आला आहे. नागरिकांनी कोरोनावर घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात येत आहे. यासाठी वेगवेगळ्या संकल्पनेतून जनजागृती केली जात आहे. याला प्रतिसाद म्हणून पोलीसांनी शिस्तीचा आलेख ठेवुन पथसंचलन करण्यात केले. यामध्ये 20 पोलीस कर्मचारी, 15 होमगार्ड, वारुळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. वर्षा गुंजाळ, कर्मचारी, एक रुग्णवाहिका, ग्रामपंचायतचे कर्मचारी असे एकूण 70 जवान, 55 मोटारसायकल, 2 पोलीस वाहने, 2 ग्रामपंचायतची वाहने, 5 रुग्णवाहिका सहभागी झाले होते.