पुणे- शिवसेनेत मी 39 वर्ष होतो. बाळासाहेब ठाकरे माझे गुरू असून त्यांच्या तालमीत मी तयार झालो आहे. फडणवीस यांना मी पाच वर्ष मुख्यमंत्री म्हणून पाहिले आहे. ते अभ्यासू व्यक्ती आहेत, सहनशील आहेत, यशवंतराव चव्हाण यांच्या आदर्शाला साजेस काम त्यांनीकेले आहे, असे मत भाजप नेते नारायण राणे यांनी व्यक्त केले. शनिवारी पुण्यात एका आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला.
'शिवसेनेच्या तालमीतच मी तयार झालो, बाळासाहेब माझे गुरू' - पुणे बातमी
उद्धव ठाकरे अनुभव शून्य व्यक्ती आहेत. त्यामुळे राज्य अधोगतीकडे जाईल अशी शंका त्यांनी व्यक्त केली. नाईट लाईफ मागणी कोणाची नव्हती. मात्र, तो चिरंजीव हट्ट आहे. हट्ट पुरवण्या ऐवजी इतर प्रश्न सोडवा, असा टोला नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.
narayan-rane
हेही वाचा-अर्थसंकल्प २०२० : व्याजातून मिळणाऱ्या उत्पन्नावर अधिक सवलत देण्यावरून गोंधळ
उद्धव ठाकरे अनुभव शून्य व्यक्ती आहेत. त्यामुळे राज्य अधोगतीकडे जाईल अशी शंका त्यांनी व्यक्त केली. नाईट लाईफ मागणी कोणाची नव्हती. मात्र, तो चिरंजीव हट्ट आहे. हट्ट पुरवण्या ऐवजी इतर प्रश्न सोडवा, असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.