नाना पटोले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुणे Nana Patole on Ramesh Bidhuri : भाजपाचे खासदार रमेश बिधुडी यांनी लोकसभेत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर राज्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी खासदार रमेश बिधुडी यांना अपात्र करून त्यांची खासदारकी काढून टाकण्याची मागणी केलीय. पुण्यात 35 व्या 'पुणे फेस्टीव्हलचं' उद्घाटन राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील तसंच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आलं, यावेळी नाना पटोलेंनी ही मागणी केलीय.
देशाच्या इतिहासातील पहिलीच घटना : भाजपला सत्तेची की मस्ती आलीय, त्याचच हे उदाहरण आहे. संसदेत भाजपाचे एक खासदार अशा पद्धतीनं शिवीगाळ करत आहेत, ही देशाच्या इतिहासातील पहिली घटना आहे. त्याचं आम्ही निषेध करतो. भाजपची मानसिकता त्यांनी बदलली पाहिजे. सत्ता आज आहे उद्या नाही, हे देशाच्या लोकशाहीसाठी घातक असल्याचं मत यावेळी पटोलेंनी व्यक्त केलं. आम्ही सरकारला सांगत आहोत की, सप्टेंबरपासून अनेक जिल्ह्यात टँकरनं पाणीपुरवठा होत आहे. सरकार दुष्काळ का जाहीर करत नाही? असा प्रश्नही नाना पाटोळेंनी उपस्थित केलाय. राज्यात हजारो शेतकरी आत्महत्या करत आहेत, असं निर्दयी सरकार पहिल्यांदा बघितलंय. सरकारनं दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे, अशी मागणी नाना पटोले यांनी केली.
भाजपाने आरक्षणाचं आश्वासन दिलं होतं : भाजपने २०१४ मध्ये मराठा आरक्षण, धनगर आरक्षणाचं आश्वासन दिलं होतं. मग आता का पळ काढत आहेत. एकमेकांशी भांडून राज्य केलं जात नाही. भाजपानं आश्वासन दिलं. त्यांनी ते पूर्ण केलं पाहिजे. पण तसं न करता फक्त अजून आश्वासनं देत आहेत, अशी टाका नाना पाटोळेंनी केलीय. आमदार अपात्रतेबाबत राहुल नार्वेकरांनी विधानसभेच्या खुर्चीचा मान राखला पाहिजे. राज्यात जे चाललं आहे ते चुकीचं आहे, असंही यावेळी नाना पटोलेंनी म्हटलंय. आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी राज्यात पुन्हा नियुक्ती केली जाणार असल्याची चर्चा आहे. यावरुनही नाना पटोले यांनी टीका करत आमचं सरकार आलं की आम्ही पुन्हा त्यांच्यावर तपास लावू, त्यांना कोणत्या आधारावर क्लीन चीट दिली याचा आम्ही खुलासा करणार असल्याचं म्हटलंय. महाराष्ट्रात परिवर्तन निश्चित असून त्यांच्यात लंगडी, कबड्डी कशी चालत आहे ते आता बघतोच आहे, अशीही कोपरखळी नाना पटोले यांनी मारली.
हेही वाचा :
- Nana Patole on Parliament Special session: संसदेचं विशेष अधिवेशन का बोलाविलं? नाना पटोले म्हणाले मोदी सरकारचा डाव...
- Nana Patole Jan Samvad Yatra : ओबीसी आणि मराठा समाजात भांडण लावून राज्याला...नाना पटोलेंचा गंभीर आरोप
- INDIA Meeting in Mumbai: 'इंडिया'च्या बैठकीत महाविकास आघाडीत 'अशी' असणार जबाबदारीची विभागणी