महाराष्ट्र

maharashtra

Tourist Place: बारामतीतील 'नाईकांचा वाडा' आता होणार पर्यटन क्षेत्र...

By

Published : Dec 24, 2021, 3:37 PM IST

बारामती नगरी (The city of Baramati) कात टाकत असून ती 'मेट्रोसिटी'च्या (Metrocity) दिशेने वाटचाल करत आहे. बारामतीच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी लवकरच शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी पॅरिसमधील 'सिटी सर्कल'च्या (City Circle in Paris) धर्तीवर 'सिटी सेंट्रल' प्रकल्पाची उभारणी व भीमथडी ते बारामती या प्रवासाचा साक्षीदार असणारा शहरातील श्रीमंत बाबूजी नाईकांच्या वाड्याची ('Naik Wada' in Baramati) जुन्या धाटणीने नव्याने उभारणी करण्यात येणार आहे

'Naikancha Wada' in Baramati
बारामतीतील 'नाईकांचा वाडा'

बारामती:शहरातून वाहणाऱ्या कहा नदीच्या काठावर १७४३ साली श्रीमंत बाबूजी नाईक यांनी भव्य वाडा उभारला. हा ‘नाईक’वाडा भीमथडी ते बारामती अशा इतिहासाचा वैभवशाली साक्षीदार आहे. हा इतिहासाचा अमूल्य ठेवा जतन करण्याचा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतला आहे. त्यांनी दिलेल्या निर्देशानुसार ‘नाईक’वाडा पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करण्यात येणार असून सध्या त्याचे काम सुरू झाले आहे.
श्रीमंत बाबूजी नाईक त्याकाळी रसिक व गुणज्ञ व्यक्ती म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या कलावधीत कवी मोरोपंताना राजश्रय मिळाला होता. त्यांनी अनेक विद्वान आणि गुणीजणांना आपलेसे केले होते. कऱ्हा नदीच्या तीरावर हा वाडा १७४३ मध्ये उभारला. हा वाडा भीमथडी ते बारामती अशा इतिहासाचा वैभवशाली साक्षीदार आहे. ही बाब विचारात घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार या वाड्याचे जैसेथे नूतनीकरण करण्यात येणार आहे.

बारामतीतील 'नाईकांचा वाडा'


या वाड्यामध्ये संग्रहालयाची उभारणी करण्यात येणार असून यात १७४३ ते १७८० पर्यंतचा श्रीमंत बाबूजी नाईक यांचा जीवनपट उलगडणार आहे. तसेच १७८० ते २०१४ पर्यंत सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक घडामोडींचा घटनाक्रमांचे बदल आणि बारामती तालुक्यात असणारे ऐतेहासिक दगडी शिलालेख पर्यटकांना पाहवयास मिळणार आहेत. वाड्याच्या तटबंदीची दुरूस्ती करण्यात येणार असून तटबंदिवरून पर्यटकांना चालता येणार आहे. त्याचबरोबर बुरुंज, नगारखाना, महाप्रवेशद्वार यांच्या पडझड झालेल्या भागाची पुर्नबांधकाम केले जाणार आहे. नाईकवाडा पर्यटन क्षेत्र विकासाचे काम सुरू झाले आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वास्तुविशारद पी.के.दास यांनी ऐतहसिक बांधकाम तज्ञाच्या साह्याने या वाड्याचा विकास आराखडा बनविला आहे. लवकरच हा वाडा बारामतीसह पर्यटकांना पाहण्यासाठी सज्ज होणार आहे .अशी माहिती ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी दिली.
या वाड्यात नगारखाना, महाद्वार, वस्तु संग्रहालाय, ८ बुरूज पुर्नबांधकाम, तटबंदी मजबुतीकरण, सभागृह, संपर्कं कार्यालय,लहान मुलांना खेळण्यासाठी ग्राऊंड, उपहारगृहासह १० दुकाने

ABOUT THE AUTHOR

...view details