महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी 'नागेश्वर महाराज अन्नछत्र' अभियान - पुणे लेटेस्ट न्यूज

कोरोना महामारीमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्याने आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. तर व्यवसाय देखील डबघाईला आले आहेत. अशा परिस्थितीत सामाजिक संस्था आणि राजकीय व्यक्ती पुढे येऊन चांगला उपक्रम करत असल्याचे पहायला मिळत आहे.

अन्नछत्र अभियान
अन्नछत्र अभियान

By

Published : May 16, 2021, 5:08 PM IST

पिंपरी-चिंचवड (पुणे) - पिंपरी-चिंचवडमध्ये सुमारे ५००हून अधिक गरजू लोकांची जेवणाची सोय भागविण्यासाठी 'नागेश्वर महाराज अन्नछत्र' अभियानाचा मोशीमध्ये शुभारंभ करण्यात आला आहे. माजी नगरसेवक धनंजय आल्हाट यांच्या युवा फाउंडेशन मित्र परिवार व समस्त ग्रामस्थ मोशी यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या योजनेतून हातावर पोट असणारे गोरगरीब, कष्टकरी लोकांना जेवणाची थाळी मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच ज्यांना कोरोना झाला आहे व जे लोक होम क्वारंटाइन आहे, अशाच्या घरी सद्यस्थितीत जेवणाची सोय नसल्याने त्या कुटुंबांना देखील मोफत घरपोच डबा पुरवण्यात येणार आहे. कोरोना महामारीमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्याने आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. तर व्यवसाय देखील डबघाईला आले आहेत. अशा परिस्थितीत सामाजिक संस्था आणि राजकीय व्यक्ती पुढे येऊन चांगला उपक्रम करत असल्याचे पहायला मिळत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details