पुणे - शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. मात्र तज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते. ही लाट कमी करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी आणि वेळेत निदान व्हावं, यासाठी ‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत पुणे महानगरपालिकेच्या वतीने ‘पुण्याचा निर्धार, कोरोना हद्दपार’ या मोहिमेला आजपासून सुरुवात करण्यात आली आहे.
माझं कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत 'पुण्याचा निर्धार, कोरोना हद्दपार' या मोहिमेला आजपासून सुरवात - पुण्याचा निर्धार, कोरोना हद्दपार मोहिम न्यूज
माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत पुणे महानगरपालिकेच्या वतीने ‘पुण्याचा निर्धार, कोरोना हद्दपार’ या मोहिमेला आजपासून सुरुवात करण्यात आली आहे.
पुण्याचा निर्धार, कोरोना हद्दपार ही मोहीम कशी राबविली पाहिजे. नागरिकांमध्ये जनजागृती कशी केली पाहिजे. याची माहिती यावेळी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना देण्यात आली. आजपासून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला असून विभागीय आयुक्त डॉ. सौरभ राव हे या मोहिमेचे प्रमुख असणार आहेत. तर मोहीम राबविण्यासाठी टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली असून यात राज्य शासनाच्या वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे.
कोरोनाची परिस्थिती एका निर्णायक टप्प्यावर आलेली आहे. म्हणूनच त्यावर नवीन नवीन उपाय योजना करणे त्याला कायमचं संपवण यासाठी काही उपाययोजना केंद्र सरकार राज्य सरकार महापालिकेच्यावतीने सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून माझं कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत, ‘पुण्याचा निर्धार, कोरोना हद्दपार' या मोहिमेला सुरवात करण्यात आली आहे. या मोहिमेद्वारे जनजागृतीचा व्यापक स्वरूप यापुढच्या काळात उभं करणे आणि कोरोनाला हद्दपार करणे हे या मोहिमेचा उद्दिष्ट आहे, असे मत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केलं.
यावेळी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना महापौर महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते मी कोरोनाला हद्दपार करणार ही शपथ देण्यात आली.