पुणे :कसबा पेठ विधानसभा मतदार संघात आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरवात झाली आहे. या मतदार संघामध्ये एकूण २ लाख ७५ हजार ६७९ मतदार आहे. २७० मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी १ हजार २५० अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. प्रत्येकी १० याप्रमाणे २७ टेबलवर मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले. गेल्या 30 वर्षापासून मी राजकारणात आहे. यंदाच्या या पोट निवडणुकीत पहिल्याच दिवसापासून जनतेने ही निवडणूक हातात घेतली आहे. पैसे नव्हे तर मनापासून जनता माझ्यामागे आहे. मीच ही निवडणूक जिंकणार असल्याचे यावेळी धंगेकर यांनी सांगितले आहे.
रवींद्र धंगेकर यांची मालमत्ता :कसबा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नीकडे एकूण 8 कोटी 36 लाख 10 हजार रुपयाची स्थावर जंगम मालमत्ता आहे. 25 तोळे सोने, तसेच धंगेकर यांच्या नावे 35 लाख 73 हजार रुपयांचे कर्ज आहे. तर पत्नींच्या नावावर 32 लाख 8 हजार रुपयांचे कर्ज आहे. त्यांच्यावर एकूण नऊ प्रलंबित खटले आहेत. रवींद्र धंगेकर यांच्या रविवार पेठ मंगळवार पेठ कसबा पेठ आणि शिवाजीनगर येथे सदनिका आहेत. दौंड तालुक्यात शेती असून कोथरूड येथे 4,500 चौरस फुटाची जागा आहे. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचे उत्सव प्रमुख अक्षय गोडसे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.