पुणे :सारसबाग चौक तसेच वडगांव परिसरात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांची आमदार म्हणून बॅनरबाजी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे शहरातील मुख्य भागात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हेमंत रासने यांचे विजयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. निकालाआधीच दोन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 50.06 टक्के मतदान झाले आहे. या मतदारसंघामध्ये एकूण 2,75,679 एवढे मतदार आहेत. यातल्या 1,38,018 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. यापैकी 74,218 पुरुष आणि 63,800 महिलांचा समावेश होता. येत्या 2 तारखेला निकाल लागणार असून कोण उमेदवार जिंकणार आहे, याआधीच बॅनरबाजी पाहायला मिळत आहे.
अनेक आरोप प्रत्यारोप: आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून हेमंत रासने तर महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत राज्यातील सर्वच आजी-माजी मंत्री यांच्या सभा रॅली तसेच कोपरा मीटिंग घेण्यात आले होते निवडणुकीच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटचं मतदान होण्यापर्यंत दोन्ही पक्षाकडून आरोप प्रत्यारोप होत होते. तसेच आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पोटनिवडणूक जाहीर झाली आणि त्यानंतर सातत्याने कसबा पोट निवडणुकीत वेगवेगळे घटना पाहायला मिळाल्या. सूरवातीला भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी बाबत झालेलं नाराजी नाट्य,त्यानंतर महा विकास आघाडीमध्ये झालेलं बंड हे देखील कसबा पोटनिडणुकीत बघायला मिळाले.
राज्यातील सर्वच नेते मंडळी कसब्यात: कसबा पोटनिवडणुकीत सुरूवाती पासूनच प्रचारात स्थानिक मुद्दे बाजूला आणि राज्य तसेच देशातील राजकीय परिस्थितीवर चर्चा प्रामुख्याने बघायला मिळाली. भारतीय जनता पक्षाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील तसेच मंत्री गिरीश महाजन तसेच स्थानिक खासदार गिरीश बापट तसेच सर्वच नेतेमंडळी प्रचारात पहायला मिळाले. तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारात देखील माजी मुख्यमंत्री, माजी मंत्री तसेच महाविकास आघाडीतील सर्वच नेते मंडळी यांचे प्रचारात सक्रिय सहभाग पाहायला मिळाले.या सर्व नेते मंडळींकडून प्रचारात कसबा मतदार संघातील स्थानिक मुद्दे कमी तर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप तसेच राज्य आणि देशातील मुद्दे प्रमुखाने मांडण्यात आले.