महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाच्या भीतीमुळे मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईक पुढे येईनात, मुस्लीम मंचाने घेतला पुढाकार - corona news in pune

मूलनिवासी मुस्लीम मंचाने याबाबत पुणे महापालिकेसोबत पत्रव्यवहार केला. त्यानंतर त्यांना या कामासाठी परवानगी मिळाली.

Muslim manch helps for last rituals on corona patient death body in Pune
कोरोनाच्या भीतीमुळे मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईक पुढे येईनात, मूल निवासी मुस्लीम मंचाने घेतला पुढाकार

By

Published : Apr 16, 2020, 9:25 AM IST

Updated : Apr 16, 2020, 10:34 AM IST

पुणे- कोरोना विषाणूमुळे जगभरात हजारो निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. या विषाणूंमुळे पुण्यात देखील आतापर्यंत 41 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूनंतर त्याचे अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईक पुढे येत नसल्याचे चित्र आहे. अशांवर प्रशासनामार्फत अंत्यसंस्कार केले जात आहेत. तर, आता पुण्यातील मूलनिवासी मुस्लीम मंचाने देखील अशा मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

कोरोनाच्या भीतीमुळे मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईक पुढे येईनात, मुस्लीम मंचाने घेतला पुढाकार
कोरोनाच्या भीतीमुळे मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईक पुढे येईनात, मुस्लीम मंचाने घेतला पुढाकार

मूलनिवासी मुस्लीम मंचाने याबाबत पुणे महापालिकेसोबत पत्रव्यवहार केला. त्यानंतर त्यांना या कामासाठी परवानगी मिळाली. महापालिकेकडून आम्हाला फक्त ३ पीपीई किट देण्यात आले आहे. पालिकेने किमान 10 किट तरी उपलब्ध करून द्यावे. तसेच कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या नागरिकांच्या नातेवाइकांना सरकार 5 लाख रुपये निधी द्यावा, अशी मागणी मूलनिवासी मुस्लीम मंचाचे अध्यक्ष अंजुम इनामदार यांनी केली आहे.

अंजुम इमानदार - अध्यक्ष मूल निवासी मुस्लिम मंच
कोरोनाच्या भीतीमुळे मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईक पुढे येईनात, मुस्लीम मंचाने घेतला पुढाकार

आत्तापर्यंत त्यांनी 4 मृतांवर अंत्यसंस्कार केले आहेत. 'आम्ही प्रत्येक धर्माच्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करीत आहोत. हे कार्य करीत असताना एकच वाटते की, मृतांच्या नातेवाईकांनी घाबरून न जाता अंत्यसंस्कार करण्यास पुढे यावे', असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Last Updated : Apr 16, 2020, 10:34 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details