कात्रजमध्ये खून करून मृतदेह लोखंडी पाइपला लटकवला, आत्महत्या भासवायचा प्रयत्न - Murdering in Katraj
पुण्यातील कात्रज येथील सुंधामाता नगर परिसरात काल दुपारच्या सुमारास ही घटना घडली. सायंकाळी हे सगळ प्रकरण उघडकीस आले आहे. प्रकाश किशन जाधव असं खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते 42 वर्षांचे होते. यामध्ये नेमका खून कुणी केला याबाबत पोलिसांची तपासाची दिशा ठरणार आहे.
पुणे - पुण्यातील कात्रज परिसरात एका व्यक्तीचा खून करत मृतदेह लोखंडी पाइपला अडकवल्याची घटना घडली आहे. पुण्यातील कात्रज येथील सुंधामाता नगर परिसरात काल दुपारच्या सुमारास ही घटना घडली. सायंकाळी हे सगळ प्रकरण उघडकीस आले आहे. प्रकाश किशन जाधव असं खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते 42 वर्षांचे होते.
आत्महत्या नाही तर खून? - या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कात्रज येथील लक्ष्मी माता मंदिराजवळ शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास प्रकाश जाधव त्यांचा मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनचे काही पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सुरुवातीच्या पाहणीत ही आत्महत्या असल्याचे पोलिसांच्या लक्षात आल होतं. मात्र पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला होता. ज्यावेळेस शवविच्छेदनाचा अहवाल आला, त्यात मात्र मृत व्यक्तीचा गळा दाबल्याने आणि डोक्यात मारहाण झालेला मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांचा संशय खरा ठरणार का - या सगळ्या घटनेवरून आरोपीची ही हत्या नसून आत्महत्या आहे असं दाखवायचं होतं म्हणून मृतदेह पाइपला लटकावला होता, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.आता या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे. यामध्ये नेमका खून कुणी केला याबाबत पोलिसांची तपासाची दिशा ठरणार आहे. या प्रकरणाच्या खोलात जाऊन नेमकी काय घटना घडली असावी याचा शोध घेण्यात येईल असे तपास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.