पुणे -शहरातील मोहम्मदवाडी परिसरातील एका सोसायटीमध्ये एका तृतीयपंथी व्यक्तीची गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घडना उघडकीस आली आहे. वानवडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरबाज शेख असे खून झालेल्या तृतीयपंथीयाचे नाव आहे.
पुण्यात तृतीयपंथीयाची गळा चिरून हत्या - Pune
शहरातील महंमद वाडी येथील सदाशिव नगर परिसरातील इमारतीत ही घटना घडली आहे. या इमारतीतील एका फ्लॅटमध्ये अरबाज शेख याचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत आढळला.
संग्रहीत छायचित्र
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महंमद वाडी येथील सदाशिव नगर परिसरात ही इमारत आहे. या इमारतीतील एका फ्लॅटमध्ये अरबाज शेख याचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत आढळला. सोसायटीतील रहिवाशांना सोमवारी सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी वानवडी पोलिसांना याची माहिती दिली.
पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला. दरम्यान, या व्यक्तीचा खून कोणी आणि का केला याचा तपास पोलीस करत आहेत.