पुणे - दौंड शहरातील छायाचित्रकार केदार श्रीपाद भागवत यांचा लिंगाळी हद्दीत खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. दौंड - लिंगाळी रस्त्यालगत काळे मळा येथील कालव्यालगत मृतदेह आढळला. डोक्यात दगड घालून व बाटली फोडून खून करण्यात आला आहे. मृतदेहाजवळ दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या आहेत. अद्याप खुनाचे कारण स्पष्ट झालेले नाही.
दौंड शहरातील छायाचित्रकराचा खून ; पोलीस तपास सुरू - छायाचित्रकराचा खून
छायाचित्रकार केदार श्रीपाद भागवत यांचा लिंगाळी हद्दीत खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. डोक्यात दगड घालून व बाटली फोडून खून करण्यात आला आहे. मृतदेहाजवळ दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या आहेत.
छायाचित्रकार केदार श्रीपाद भागवत
अभिजित श्रीपाद भागवत यांनी यासंदर्भात दौंड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दौंड शहरातील ज्येष्ठ छायाचित्रकार श्रीपाद भागवत यांचे केदार हे ज्येष्ठ चिरंजीव आहेत. पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी याबाबत सांगितले की, डोक्यात दगड घालून खून केल्याचे प्राथमिक आढळून आले आहे. त्या दृष्टीने सर्व शक्यता विचारात घेऊन खुनाचा तपास केला जात आहे. प्रभारी पोलीस उपअधीक्षक नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक सुनील महाडिक आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.