पुणे - पुण्यातील एनसीएलमध्ये (राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा) पीएचडी करणाऱ्या एका तरुणाचा गळा चिरून आणि दगडाने चेहरा ठेचून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. पुण्यातील सुसखिंड परिसरात त्याचा मृतदेह पोलिसांना सापडला. सुदर्शन उर्फ बाल्या बाबुराव पंडीत (30) रा. शिवनगर जि. जालना, असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.
निर्घृणपणे करण्यात हत्या -
शनिवारी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या काही नागरिकांना सुसखिंडीत मृतदेह दिसला. काही नागरिकांनी पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर चतु:शृंगी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अत्यंत निर्घृणरित्या ही हत्या करण्यात आली होती. मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या अंगावरील पूर्ण कपडे काढण्यात आले होते. तसेच त्याच्या खिशात पाकीट सापडले असून त्यात असलेल्या कागदपत्रावरून पंडीत यांची ओळख पटली. सुदर्शन पंडित हे पाषाण येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत पीएचडी करत होते. ते मूळचे जालना जिल्ह्यातील होते. सुतारवाडी परिसरात पेईंगगेस्ट म्हणून राहत होते.
हेही वाचा - जळगाव जिल्ह्यात कोरोना लसीकरणाची गती संथ; गेल्या दीड महिन्यात अवघे 55 टक्के लसीकरण