महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

PCMC Crime News : वाढदिवसाला रंगली बिअरची पार्टी; वादात केला मित्राचा खून - PCMC Crime News

अभिजितचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे ( Senior PI Krushndev Kharade ) यांनी दिली आहे. खून केल्यानंतर आरोपी अमित लगस हा फरार झाला. चिंचवड पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

तरुणाचा खून
तरुणाचा खून

By

Published : Jan 5, 2022, 10:39 PM IST

पुणे-पिंपरी-चिंचवडमध्ये वाढदिवसाच्या पार्टीमध्ये एका तरुणाचा खून करण्यात आला आहे. ही घटना ( Pimpari Chinchwad crime news ) आज सकाळी उघडकीस आली आहे. तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अभिजित पवार ( वय- 22 ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सुमित जगताप नावाच्या तरुणाचा वाढदिवस होता. तेव्हा, काही तरुण तिथे जमा झाले होते. अभिजित आणि अमित हेदेखील त्या ठिकाणी होते. वाढदिवस जंगी झाल्यानंतर बिअरची पार्टी ( friend murder on birthday ) रंगली. ही पार्टी मोकळ्या शेतात होती. तेव्हाच, अभिजित आणि अमितमध्ये वाद झाला. यातूनच बिअरची बॉटल थेट अभिजितच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले.

हेही वाचा-चंद्रपूर : दारुड्या पतीने पत्नीला डिझेल टाकून जाळले; पत्नीचा मृत्यू

अभिजितचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे ( Senior PI Krushndev Kharade ) यांनी दिली आहे. खून केल्यानंतर आरोपी अमित लगस हा फरार झाला. चिंचवड पोलीस आरोपीचा शोध ( Chinchwad Police search of accused ) घेत आहेत.

हेही वाचा-Maharashtra Colleges Closed : मोठा निर्णय.. राज्यभरातील कॉलेज 15 फेब्रुवारीपर्यंत बंद

ABOUT THE AUTHOR

...view details