महाराष्ट्र

maharashtra

दौंडमध्ये किरकोळ कारणावरून ऊस तोडणी मजुराचा खून

By

Published : Jan 17, 2021, 3:36 PM IST

दौंड तालुक्यातील काळेवाडी येथे ऊस तोडीस का गेला नाही, असे विचारत दोन मजुरांना तीन तरुणांनी मारहाण केली. यात एकाचा मृत्यू झाला असून एक जण जखमी आहे.

दौंड पोलीस ठाणे
दौंड पोलीस ठाणे

दौंड (पुणे) -तालुक्यातील काळेवाडी येथे ऊस तोडीस का गेला नाही, असे विचारत दोन मजुरांना तीन तरुणांनी मारहाण केली. यात गंभीर दुखापत होऊन एका मजुराचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपचार सुरू असताना मृत्यू

घनश्याम भोसले, भागवत भोसले ,सौरभ (सर्व रा. काळेवाडी, ता. दौंड, जि. पुणे ) हे तिघे ऊसतोडणी करायला का गेला नाही, अशी विचारणा करत लोखंडी गज, लाकडी दांडक्यांनी पर्वत गुलसिंग ब्राह्मणे व सुनील सत्यनारायण उर्फ गुलाब शर्मा याला मारहाण केली. या मारहाणीत सुनील हा गंभीर जखमी झाला होता. त्यास उपचारासाठी अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, उपचारादरम्यान सुनील शर्माचा मृत्यू झाला आहे.

भट्टा गुलसिंग ब्राह्मणे (मुळ रा. भगवानपुरा, जि. खरगोन, मध्य प्रदेश, हल्ली रा. काळेवाडी पहाणे वस्ती, ता. दौंड, जि. पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीवरून दि. 14 जानेवारीला आरोपींविरोधात भा.दं.वि.च् कलम 302, 323, 341, 506 व 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा -पुणे जिल्ह्यात सापडला 'बर्डफ्लू'चा विषाणू; पाच हजार कोंबड्याची विल्हेवाट

ABOUT THE AUTHOR

...view details