पुणे - पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नवले ब्रीज जवळ तीन दिवसांपूर्वी एक मृतदेह सापडला होता. खून केल्यानंतर हात-पाय बांधलेल्या अवस्थेत एका पोत्यात भरून हा मृतदेह फेकण्यात आला होता. भारती विद्यापीठ पोलिसांनी या खुनाचा छडा लावला असून एका आरोपीला अटक केली आहे. अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुण्यातील 'त्या' खुनाचा उलगडा; अनैतिक संबंधातून झाली हत्या, एकाला अटक - नवले ब्रिज पुणे
खून केल्यानंतर हात-पाय बांधलेल्या अवस्थेत एका पोत्यात भरून हा मृतदेह फेकण्यात आला होता. भारती विद्यापीठ पोलिसांनी या खुनाचा छडा लावला असून एका आरोपीला अटक केली आहे. अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणी रोहिदास पाटोळे (वय 45) याला अटक केली आहे. तर अमर क्षीरसागर (वय 22) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन मध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल आहे. मृत अमर क्षीरसागर याचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. तर याच महिलेसोबत आरोपी रोहिदास पाटोळे याचे देखील अनैतिक संबंध होते. यावरून त्यांच्यात अनेकदा भांडण झाले होते. त्यातूनच हा खून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. रोहिदास पाटोळे याने खून केल्यानंतर मृतदेहाचे हात पाय बांधले आणि एका पोत्यात भरून ते नवले ब्रिज जवळ आणून फेकले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती. तपास सुरू असताना मयत व्यक्तीची ओळख पटली आणि त्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेत त्याला अटक केली.