पुणे :सध्या राज्यात राजकीय परिस्थिती दिवसेंदिवस तापत असून एकमेकांवर प्रत्यारोपाच्या फेऱ्या सुरू आहेत. सर्वच पक्षाकडून महापालिकेच्या निवडणुकीच्या तयारी देखील जोमात सुरू आहे. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील येणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी ( Municipal election ) आता जोमाने कामाला लागल्याचे चित्र आहे. महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 3500 राजदूत नेमण्यात येणार आहे.
मनसेचे 3500 राजदूत : पुण्यात मनसे 3500 राजदूत नेमणार ( 3500 ambassadors of MNS in Pune ) आहे. पुण्यातील प्रत्येक सर्वसामान्य नागरीक आणि मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी मनसेने राजदूत ही नवी संकल्पना आणली आहे. या उपक्रमातून मनसे पुण्याच्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे.
राजदूत नेमण्याबाबतच्या सूचना : मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी शहरातील विविध भागातील सर्व पदाधिकाऱ्यांना राजदूत नेमण्याबाबतच्या सूचना केल्या ( instruction ambassadors appointment ) आहेत. त्यानुसार पुण्यात मनसे संघटनात्मक पातळीवर विभागनिहाय नेमणूका करणार आहे. दर एक हजार मतदारामागे एक राजदूत अशी नेमणूक करण्यात येणार आहे. पुण्यात लवकरच राजदूतांची नेमणूक करण्यात येईल. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पुण्यात मेळावा ( Raj Thackeray Melava in Pune ) होईल. या मेळाव्यानंतर लगेच आगामी पुण्याच्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची भव्य सभा देखील घेतली जाण्याची शक्यता आहे.
भाजप कोअर कमिटी, मंत्र्यांची बैठक : महापालिका निवडणूक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी भाजपकडूनही हालचाली वाढल्या आहेत. मुंबईतही भाजप कोअर कमिटी आणि सर्व मंत्र्यांची आज रात्री आठ वाजता महत्त्वपूर्ण बैठक होणार ( BJP core committee and ministers meeting) आहे. मंत्री आणि कार्यकर्ते यांच्या समन्वयाबद्दलही बैठकीत चर्चा होणार आहे. भाजपच्या बैठकीला देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे गिरीश महाजन रवींद्र चव्हाण, आशिष शेलार, प्रवीण दरेकर यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित असणार