महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर 13 जूनला ब्लॉक - maharashtra road

यासंदर्भात महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंद दरम्यान सर्व प्रकारची अवजड आणि मालवाहतूक करणारी वाहने द्रुतगती मार्गावर थांबवण्यात येणार आहे. त्याप्रमाणेच हलकी चारचाकी आणि इतर प्रवासी वाहने ही द्रुतगती मार्गावरील येथून जुना मुंबई-पुणे महामार्गाद्वारे मुंबईकडे वळविण्यात येणार असल्याचेही महामार्ग पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर 13 जूनला ब्लॉक

By

Published : Jun 11, 2019, 11:50 PM IST

पुणे - महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून पुणे - मुंबई द्रुतगती मार्गावर कामशेत येथे ओव्हरहेड गँट्री बसवण्यात येणार आहे. त्यामुळे १३ जूनला दुपारी १२ ते २ वाजेदरम्यान मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
यासंदर्भात महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंद दरम्यान सर्व प्रकारची अवजड आणि मालवाहतूक करणारी वाहने द्रुतगती मार्गावर थांबवण्यात येणार आहे. त्याप्रमाणेच हलकी चारचाकी आणि इतर प्रवासी वाहने ही द्रुतगती मार्गावरील येथून जुना मुंबई-पुणे महामार्गाद्वारे मुंबईकडे वळविण्यात येणार असल्याचेही महामार्ग पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details