पुणे :मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर लोणावळ्याजवळ ओव्हर ब्रीजवर ऑइल टँकरचा अपघात होऊन भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. यामुळे ब्रीजखाली देखील अपघात घडल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून त्यात एका बारा वर्षांच्या मुलाचा समावेश आहे, तर दोननजण गंभीर जखमी आहेत. ही आग लगल्याने बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. सध्या वाहतूक लोणावळा शहरातून वळवली जात आहे. एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी होऊ शकते, त्यामुळे बचावकार्य वेगाने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
बीआरटी रस्त्यावर टँकरचा मोठा अपघात :आज सकाळीचबीआरटी रस्त्यावर टँकरचा मोठा अपघात झाला आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु तेलगळती मोठ्या प्रमाणावर झाली आहे. शहरात अपघाताचे सत्र वाढत चालले आहे. रस्त्यावर पडलेले ऑईल गोळा करण्यासाठी नागरिकांनी खूप गर्दी केलेली होती. टँकर मार्गावर पलटी झाल्यामुळे हा अपघात झाला. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कोंडी झाल्याचे चित्र दिसत होते.