महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दीड वर्षानंतर नव्या रुपात डेक्कन एक्स्प्रेस सुरू, विस्टाडोममधून प्रवास होणार आनंददायी

कोरोनाच्या काळात गेल्या दिड वर्षांपासून बंद असलेली मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेस शनिवारपासून सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आजपासून या रेल्वेला नवीन खास विस्टाडोम कोच बसविण्यात आले आहे.

पुणे
पुणे

By

Published : Jun 26, 2021, 6:25 PM IST

पुणे - राज्यात गेल्या दीड वर्षापासून कोरोना संकट आहे. आता कोरोनाचे रुग्ण कमी होत आहेत. त्यामुळे हळूहळू निर्बंध शिथिल होत आहेत. मध्य रेल्वेच्या वतीनेही हळूहळू आता विविध रेल्वे सुरू केल्या जात आहेत. कोरोनाच्या काळात गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेली मुंबई-पुणे आणि पुणे-मुंबई असा प्रवास करणारी डेक्कन एक्स्प्रेस शनिवारपासून (26 जून) सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आजपासून या रेल्वेला नवीन विस्टाडोम कोच बसविण्यात आले आहे.

रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहांनी दिली माहिती

विशेष विस्टाडोम कोचमधून प्रवास होणार आनंददायी

पर्यटनाला चालना देण्यासाठी भारतीय रेल्वेने विस्टाडोम कोच तयार केले आहेत. म्हणजेच यात बसवलेले सीट पूर्णपणे 360 डिग्री फिरणार आहे. या कोचमध्ये प्रवास करताना प्रवासी त्यांच्या आरामदायक सीटवर बसून बाहेरचे दृश्य पाहू शकतात. यात वाय-फाय, प्रवासी माहिती प्रणाली स्वयंचलित आणि मोठे स्लायडींग दरवाजे आहेत. त्यामुळे प्रवास अधिक मनोरंजक होणार आहे. या कोचचे तिकीट 850 रुपये आहे. याबाबतची माहिती रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी दिली.

इंद्रायणी एक्स्प्रेससह 50 गाड्या होणार सुरू

मध्य रेल्वेच्या वतीने जुलै महिन्यात रेल्वेचे वेळापत्रक बनवले जाते. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये नवीन गाड्या सुरू होतात. पण कोरोनाच्या पाश्वभूमीवर रेल्वेच्या वतीने विविध गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे, तसे मध्य रेल्वेच्या वतीने गाड्या सुरू करण्यात येत आहेत. पुणे रेल्वे स्थानकावरून 11 गाड्या सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या गाड्या सुरू होणार आहे. यात पूणे-काझीपेठ, कोल्हापूर- नागपूर, पूणे -मुंबई इंद्रायणी, पुणे-नागपूर, पुणे-अजनी अशा विविध गाड्या सुरू होणार आहेत. एकूण 50 गाड्या सुरू होणार असल्याचे हर्षा शहा यांनी सांगितले.

हेही वाचा -बीडमध्ये विवाहितेची हत्या झाल्याचा नातेवाईकांचा आरोप, गेवराई ठाण्यात गुन्हा दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details