महाराष्ट्र

maharashtra

पिंपरी-चिंचवडमध्ये मुंबईतील व्यापाऱ्याच्या मॅनेजरचे 35 लाखांसाठी अपहरण, पाच आरोपी गजाआड

By

Published : Oct 13, 2020, 5:21 PM IST

पिंपरी-चिंचवडमध्ये मुंबईमधील एका व्यापाऱ्याच्या मॅनेजरचे 35 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. पोलिसांनी तपासचक्र फिरवत त्यांची तीन दिवसांनी सुटका केली. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून तीनजण अद्याप फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मुंबईतील व्यापाऱ्याच्या मॅनेजरचे 35 लाखांसाठी अपहरण
मुंबईतील व्यापाऱ्याच्या मॅनेजरचे 35 लाखांसाठी अपहरण

पुणे - पिंपरी-चिंचवडमध्ये मुंबईमधील व्यापाऱ्याच्या मॅनेजर चे 35 लाखांसाठी अज्ञात आठ जणांनी अपहरण केले असून त्यांची तीन दिवसांनी सुखरूप सुटका पोलिसांनी केली आहे. या घटनेप्रकरणी पाच जणांना अटक केली आहे. तर, इतर तीनजण फरार असून त्यांचा शोध निगडी पोलीस घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यापारी आणि त्यांचा 27 वर्षीय मॅनेजर हे शहरातील आकुर्डी येथील सिल्व्हर सेव्हन हॉटेलमध्ये कामानिमीत्त आले होते. दरम्यान, शनिवारी मॅनेजर हा गुंतवणुकीसाठी एका व्यक्तीकडून 5 लाख रुपये आणण्यासाठी गेला असता त्याचे आठ जणांच्या टोळक्याने 35 लाखांसाठी अपहरण केले. त्यानंतर अपहरणकर्त्यांनी या मॅनेजरला विविध ठिकाणी नेऊन व्यापाऱ्याकडे खंडणीची मागणी केली. मॅनेजरला सोडवायचे असल्यास 35 लाख रुपये दे, अन्यथा त्याला जीवे मारून टाकू अशी धमकी आरोपींनी व्यापाऱ्याला दिली. दोन दिवस मॅनेजर हा आरोपींच्या तावडीत होता.

आरोपींचा पैशांसाठी वारंवार फोन येत असल्याने 43 वर्षीय व्यापाऱ्याने अखेर निगडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. यानंतर, रात्री उशिरा आरोपींंना पैसे घेण्यासाठी हॉटेल सिल्व्हर सेव्हनच्या परिसरात बोलावून काही आरोपींना सापळा रचून पोलिसांनी ताब्यात घेतले. आपले साथीदार पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि पोलीस आपल्या मागावर असल्याचे समजताच इतर तीन जणांनी अपहरण झालेल्या मॅनेजरला डांगे चौकात सोडून ते फरार झाले. या प्रकरणी निगडी पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने एकूण 5 जणांना अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

हेही वाचा -उद्धवा धुंद तुझा दरबार: आळंदीत वारकरी, भाजपाच्यावतीने मंदिरापुढे आंदोलन

ABOUT THE AUTHOR

...view details