महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुणे-बंगळुरू महामार्गावरील मुळा नदीवरील पुलाला भेगा; वाहतूक बंद - मुळा नदीवरील पूल

हिंजवडीमधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी कोट्यवधी रूपये खर्च करून पूल बांधण्यात आला. गेल्या काही दिवसांपूर्वीच हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यावरून मुंबई तसेच हिंजवडीकडे वाहतूक होत होती.

पुणे-बंगळूरू महामार्गावरील मुळा नदीवरील पुलाला भेगा; वाहतूक बंद

By

Published : Aug 5, 2019, 7:53 AM IST

पुणे- पुणे-बंगळुरू महामार्गावरील मुळा नदीवर बांधलेल्या पुलाला मधोमध भेगा पडल्या आहेत. तसेच सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुळा नदीला पूर आला आहे. त्यामुळे हा पूल वाहून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पुणे-बंगळूरू महामार्गावरील मुळा नदीवरील पुलाला भेगा; वाहतूक बंद

हिंजवडीमधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून हा पूल बांधण्यात आला. गेल्या काही दिवसांपूर्वीच हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. त्यावरून मुंबई तसेच हिंजवडीकडे वाहतूक होत होती. अनेक अभियंते याच पुलाचा वापर करून हिंजवडीकडे जात असतात. त्यापैकीच काही अभियंत्यांनी रविवारी दुपारी पुलाला भेगा पडल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले. मात्र, पोलिसांनी सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर काही तासातच हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.

पुलाच्या मध्यभागी भेगा पडल्या आहेत. त्यामुळे ठेकेदाराची चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तसेच प्रवासी आणि अभियंत्यांच्या जिवाशी खेळण्यास ठेकेदाराला कोणी परवानगी दिली? असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे आता ठेकेदारावर कारवाई होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details