पुणे: मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसैन यांनी येथे 1400 वर्षापूर्वी दिलेल्या थोर बलिदानाला उजाळा दिला. आज ( यौमे आशूर) च्या दिवशी शिया मुस्लीम समाजाच्या वतीने जुन्नर शहरात भर पावसात मिरवणूक काढून हजरत इमाम हुसैन यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने शिया मुस्लिम समजाचे लोक उपस्थित होते. मोहरम हा आनंदाचा सण नसून दु:खाचा दिवस आहे. या महिन्यात इमाम हुसैन यांचे बलिदान उजागर केले जाते. शिया मुस्लिम समुदायातील लोक काळे कपडे घालून या बलिदानासाठी जुलूस काढतात आणि इमाम हुसैन यांनी दिलेल्या बलिदानाची आठवण करून देतात.
Muharram : मोहरम म्हणजे काय? शिया मुस्लीम समाज स्वतःला का मारतात? जाणून घ्या - शिया मुस्लिम समाज
मुस्लीम लोक मानतात की,हजरत इमाम हुसैन यांनी इस्लाम वाचविण्यासाठी मरण पत्करल होतं. दीन-ए-इस्लाम वाचवण्यासाठी त्यांनी एकापेक्षा एक बलिदान दिल्याचे सांगितले जाते. यामध्ये त्यांच्या सहा महिन्यांच्या मुलासह त्यांच्या 18 वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे.
ही आहे कथा: भारतात ठिकठिकाणी आज जुलूस काढला जातो, तेव्हा-तेव्हा सर्वधर्मीय नागरिक या जुलूसचे स्वागत करून अलम ( पंजा ) आणि ताबूत घेऊन जे लोक उभे असतात. त्यांच्या पायावर पाणी टाकून आंदरांजली व्यक्त करतात. जुन्नर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार करून मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी या मिरवणुकीत नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हजरत मोहम्मद पैगंबर यांचे जवाई हजरत आली यांचे पुत्र हजरत इमाम हुसैन हे मोहरम महिन्याच्या10 तारखेला म्हणजेच रोजे आशुरला करबला येथे शहीद झाले. इराकची राजधानी असलेल्या इराकमधील करबला या गावात 'तारीख-ए-इस्लाम 'च ऐतिहासिक युद्ध झाल होते. हे युद्ध सत्य आणि असत्याची लढाई होती. त्या काळी यजीद एक क्रूर शासक होता. त्याची प्रतिमा समाजात चांगली नव्हती. मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसैन यांनी त्याला विरोध केला होता. क्रूर शासक यजिदने एक तर माझे शासन मान्य करा अन्यथा युद्ध करा,असा फर्मान त्याने काढला होता. तेव्हा हजरत हुसैन यांनी त्याचा तो फर्मान रद्द करून युद्धाला तयार झाले.
आशुरा म्हणजे काय: इस्लाम धर्माच्या पहिल्या महिन्यात मोहरमची 10 तारीखेला (10 मुहर्रम 61 हिजरी, अर्थात 10 ऑक्टोबर,680 इ.स).मुस्लिमांच्या म्हणण्यानुसार हुसैन स्वतःच्या छोट्या सैन्यासह करबलाला पोहोचले होते. इस्लामिक कॅलेंडरनुसार 2 मोहरमला करबलाला पोहोचले होते. त्यांच्या ताफ्यात महिलाही होत्या. मुलंही होती. करबला पोहोचला तेव्हा ते म्हातारे झाले होते. 7 मोहरमला यजीदने त्यांच्यासाठी पाणी बंद केले होते. हुसेनला यजीदचे राज्य मान्य नव्हते. त्यावेळी यजीदने हुसैन यांना पाण्याची बंदी केली होती. त्यात ते शहीद झाले होते. त्यामुळे म्हणून या दिवसाला 'यौमे आशुरा' म्हणून सर्वत्र दुःखद ( शोक) केला जातो. इमाम हुसैन यांच्याबरोबर जे लोक होते त्यात महिला-पुरूष व मुलांचा समावेश होता. यात त्यांचे 6 महिन्यांचा बाळ अली असगर हे देखील होते आणि त्यावेळी ते देखील 3 दिवस विनापाण्याचे होते. अशा परिस्थितीही ते युद्ध करण्यास तयार होते.अब्बास इब्ने अली हे हजरत हुसेनच्या सैन्याचे प्रमुख होते. शेवटच्या क्षणापर्यंत इमाम हुसैन यांनी आजोबा मोहम्मद पैगंबर यांची शिकवण आणि त्यांचा इस्लाम हाच खरा इस्लाम आहे. हे सांगितले पण क्रूर यजिदच्या सैन्याने इमाम हुसैन यांची कोणतीही गोष्ट न ऐकता त्यांना शहीद केले.याची आठवण म्हणून सर्वत्र मोहरम साजरा केला जातो.