महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुण्याच्या ग्रामीण भागातून एसटी सेवा पूर्ण क्षमतेने सुरू - राजगुरूनगर बस आगार न्यूज

मार्च महिन्यात देशात कोरोनाने शिरकाव केला व धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले. याकाळात राज्य परिवहन महामंडळाची बस सेवाही बंद होती. आता ही बससेवा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आली आहे.

ST Bus
एस टी बस

By

Published : Oct 27, 2020, 3:15 PM IST

पुणे -कोरोना लॉकडाऊन काळात खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यातील एसटी बस सेवा बंद होती. या चार तालुक्यातील एसटी बससेवा आजपासून पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहे. राजगुरूनगर आगारातून आज एसटी बसेसला हार व फुलांनी सजवून प्रवासी सेवेत सज्ज करण्यात आले. हळूहळू ग्रामीण व शहरी भागात शेतकरी, विद्यार्थी, कामगार वर्ग आणि सामान्य नागरिकांचा बस सेवेला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती राजगुरूनगर आगाराचे व्यवस्थापक रमेश हांडे यांनी दिली.

पुणे-नाशिक महामार्गावरील राजगुरूनगर एसटी बस आगार महत्त्वाचे आहे. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सर्वाधिक उत्पन्न देणारे आगार अशी राजगुरूनगरची ओळख आहे. या ठिकाणावरून मुंबई, नाशिक, औरंगाबाद सातारा, पंढरपूर, बार्शी, आळंदी, भिमाशंकर, पुणे, धुळे, जळगाव, अहमदनगर आदी ठिकाणी अनेक वर्षांपासून बस सेवा पुरवली जाते.

राजगुरूनगर आगारातून सुरू झालेल्या बससेवेबाबत माहिती देताना आगार व्यवस्थापक

सर्वांना करता येणार प्रवास -

आजपासून सुरू झालेली एसटी बस सेवा सर्वांसाठी खुली करण्यात आली आहे. प्रत्येक बस स्वच्छ धुवून व निर्जंतुकीकरण करूनच सोडली जात आहे. अगोदर प्रवासी संख्येवर मर्यादा लावण्यात आली होती. मात्र, आता प्रवासी मर्यादा काढण्यात आली आहे. त्यामुळे लहान मुले, पासधारक, ज्येष्ठ नागरिक अशा सर्वांना एसटी प्रवासाचा लाभ घेता येणार आहे, असे रमेश हांडे यांनी सांगितले.

राजगुरूनगर आगारातून सुटणार लांब पल्ल्याच्या गाड्या -

कोरोना महामारी, लॉकडाऊनमुळे एसटी सेवा बंद करण्यात आली होती. लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर ग्रामीण भागातील एसटी सेवा काही अंशी सुरू झाली होती. यात लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रवासाची परवानगी नव्हती. सुरुवातीला बस सेवेला नागरिकांनी प्रतिसाद दिला नाही. मात्र, आता सणांच्यानिमित्ताने आणि कोरोनाचे संक्रमण व नागरिकांच्या मनातील भीती काहीशी कमी झाल्याने शासनाने दिलेल्या परवानगीनुसार एसटी बस सेवा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आली आहे. लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. त्यामुळे मुंबई, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, बार्शी, सातारा, पंढरपूर, मांढरदेवी आदी ठिकाणी जाणाऱ्या गाड्यांच्या फेऱ्या राजगुरूनगर आगारातून सुरू करण्यात आल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details