एमपीएससी विद्यार्थ्यांचे अलका चौकामध्ये आंदोलन पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 2023 पासून परीक्षेचा पॅटर्न बदलल्याने विद्यार्थ्यांनी अलका चौकात आंदोलन केले. आंदोलनात राजकीय नेत्यांचा सुद्धा सहभाग होता. आमदार गोपीचंद पडळकर आमदार अभिमन्यू पवार, माजी मंत्री सदाभाऊ खोत देखील आंदोलनात सहभागी झाले होते. राज्य सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पत्र लिहून विनंती केली आहे, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी विद्यार्थ्यांना दिले होते.
अलका चौकामध्ये आंदोलन :विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आले म्हणून विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. मात्र, त्यानंतर आज पुन्हा अलका चौकात एमपीएससीची तयारी करणारे काही विद्यार्थी बसले. आमचे लाखो रुपयाचे नुकसान होणार आहे. आमची एक-दोन वर्षे वाया जाणार आहेत. त्यामुळे आम्ही आंदोलन करत आहोत. आम्ही डिसक्रिप्टीव्ह पद्धतीने तयारीसुद्धा केलेली आहे. आयोगाने 16 महिन्यापूर्वीच हे जाहीर केलेले असल्यामुळे विद्यार्थ्यांची मागणी रास्त आहे. ज्या विद्यार्थ्यांचे अभ्यास पूर्ण झाले. त्यांचे नुकसान होईल. त्यामुळे आयोगामध्ये कुणीही हस्तक्षेप करू नये अशी आमची मागणी असल्याचे त्या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
विद्यार्थ्यांचे नुकसान होईल :खरेतर विद्यार्थ्यांच्या गटांमध्ये राजकारण किंवा आंदोलन होणे हे देशाच्या भवितव्यासाठी योग्य नाही. परंतु राजकीय लोकांच्या हस्तक्षेपामुळे पुण्यात असे सातत्याने आंदोलन होत आहे. असे या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. तो हस्तक्षेप कमी करून विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी, आता राज्य सरकार आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने, काम करणे गरजेचे असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात येत आहे.
दहा वाजल्यापासूनच विद्यार्थांचे आंदोलन : पुण्यातील अलका चौकामध्ये आज सकाळी दहा वाजल्यापासूनच हे विद्यार्थी आंदोलनाला बसले आहेत. नवीन पॅटर्न लागू करावा, चांगले विद्यार्थी, चांगले ऑफिसर व्हावे अशी आमची अपेक्षा असल्याचे मत व्यक्त केले आहे. जवळपास पाचशे ते साडेपाचशे विद्यार्थी आंदोलनात सहभागी झालेले आहेत. आता राज्य सरकार यामधून कसा मार्ग काढणार हे देखील पाहणे महत्वाचे आहे. एक विद्यार्थ्यांचा गट एका पद्धतीसाठी आग्रह आहेत. तर दुसऱ्या गटाचे मत वेगळे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये दोन गट पडल्याचे पुण्यात चित्र आहे. परंतु आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने, राज्य सरकार काय निर्णय घेणार. ते पाहणे महत्वाचे आहे. आता सरकार दोन्ही बाजूने अडचणीत सापडले आहे. निर्णय घ्यावा तरी काही विद्यार्थी आंदोलन करणार आणि निर्णय घेतला नाही तरी काही विद्यार्थी आंदोलन करणार हे निश्चित आहे.
हेही वाचा :108 Types Dishes In Dinner: गावात चर्चा जेवणाची; जावयासाठी जेवणात 108 प्रकारचे पदार्थ