पुणे : राज्यसेवा मुख्य परीक्षा पॅटर्न 2025 पासून राबविण्यात यावे. या मागणीसाठी पुण्यातील अलका चौक येथे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्यावतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जोरदार घोषणा देण्यात आल्या. शुक्रवारी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू असलेले हे आंदोलन अजूनही सुरच होते. मध्यरात्री दोन वाजल्याच्या सुमारास म्हाडा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विद्यार्थ्यांची भेट घेत उद्या तुमच्या मागण्या उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचविण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानंतर देखील हे आंदोलन सुरू होतं. आता 5 जणांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांशी भेट होणार असल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित केले आहे.
अचानक आयोगाने आदेश काढला : या आंदोलनात काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सकाळी 10 वाजल्यापासूनच सामील झाले होते. ते देखील अजूनही विद्यार्थ्यांच्या या आंदोलनात सहभागी झाले होते. विद्यार्थी मागील अनेक वर्षांपासून राज्यसेवा परीक्षेची तयारी करीत आहेत. पण अचानक आयोगाकडून आदेश काढला जातो की 2023 पासून तुमच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात येत आहे. हा निर्णय आम्हाला मान्य नाही. आयोगाने 2025 मध्ये तो नियम लागू करावा अशी आमची राज्य सरकारकडे मागणी आहे. राज्य सरकार अनेक निवडणुका पुढे घेत जात आहे. त्यामुळे आमचा अभ्यासक्रमाचा निर्णय 2025 पासून लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारला सहज शक्य आहे. त्यामुळे राज्य सरकारने विद्यार्थ्यांचा विचार करून निर्णय घ्यावा. अशी मागणी यावेळी विद्यार्थ्यांच्यावतीने करण्यात येत आहे.