महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

MPSC Student Suicide : पुण्यात एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्याची कौटुंबिक नैराश्यातून आत्महत्या - पीएसआय फिजिकल

पुण्यात एमपीएससी करणाऱ्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. यापूर्वी स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. त्यानंतर आज सांगलीच्या अमर मोहिते या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. तो अभ्यासासाठी पुण्यात आला होता. सदाशिव पेठेतील हॉस्टेलमध्ये राहायचा. तो पीएसआय फिजिकलची तयारी करत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील एमपीएससी करणारा अमर मोहिते या विद्यार्थ्याने कौटुंबिक नैराश्यातून आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शी पोलीस तपासातून निष्पन्न झाले आहे. याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक कुंडलीक कायगुडे यांनी दिली.

MPSC Student Suicide
पुण्यात एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्याची कौटुंबिक नैराश्यातून आत्महत्या

By

Published : Jan 15, 2022, 5:35 PM IST

Updated : Jan 15, 2022, 11:04 PM IST

पुणे -पुण्यात एमपीएससी करणाऱ्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. यापूर्वी स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. त्यानंतर आज सांगलीच्या अमर मोहिते या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. तो अभ्यासासाठी पुण्यात आला होता. सदाशिव पेठेतील हॉस्टेलमध्ये राहायचा. तो पीएसआय फिजिकलची तयारी करत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील एमपीएससी करणारा अमर मोहिते या विद्यार्थ्याने कौटुंबिक नैराश्यातून आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शी पोलीस तपासातून निष्पन्न झाले आहे. याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक कुंडलीक कायगुडे यांनी दिली.

पोलीस निरीक्षक कुंडलीक कायगुडे माहिती देताना

9 महिन्यापूर्वीच विवाह झालेला -

अमर यांचा भाऊ पुण्यात कामाला असून त्याच्याकडून ही माहिती मिळाल्याचे सांगण्यात आले. अमर मोहिते याचा 9 महिन्यापूर्वीच विवाह झालेला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

नैराशातून टोकाचे पाऊल उचलले -

मूळचा सांगलीचा रहिवाशी असलेला अमर मोहिते (Amar Mohite) हा पुण्यात MPSC परिक्षेची तयारी करत होता. मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे पीएसआयच्या फिजिकलमधून अमर बाहेर पडला होता. तेव्हापासून तो नैराश्यात होता. त्यातच कोरोना काळात एमपीएससीची परीक्षाही अनेकदा रद्द झाली. तसेच, पुढे ढकलावी लागली आहे. त्याचा फटका अनेक विद्यार्थ्यांना बसला आहे. त्यातूनच नैराशात असलेल्या अमरने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात होता. त्याचा भाऊ पिंपरी चिंचवड पोलीस दलात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असल्याचे समजते. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पुण्यातील एमपीएससी करणारा अमर मोहिते या विद्यार्थ्याने कौटुंबिक नैराश्यातून आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शी पोलीस तपासातून निष्पन्न झाले आहे. याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक कुंडलीक कायगुडे यांनी दिली.

हेही वाचा -CRPF Recruitment Scam In Nagpur : राज्य राखीव पोलीस बल भारतीत घोटाळा; लेखी परीक्षेत बसवले डमी उमेदवार

Last Updated : Jan 15, 2022, 11:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details