पुणे MPSC Main Exam २०२२ Result : राज्यसेवा मुख्य परीक्षेचा (MPSC) 2022 चा अंतिम निकाल नुकताच जाहीर झालाय. एकूण 613 पदांसाठी घेण्यात आलेल्या या परीक्षेत विनायक पाटील यानं राज्यात प्रथम क्रमांक पटकावलाय. तर पूजा अरुण वंजारी हिनं 570.25 गूण मिळवून मुलींमध्ये प्रथम येण्याचा मान मिळवलाय.
निकाल झाला जाहीर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं राज्यसेवा मुख्य परीक्षा- 2022 च्या निकालाची अंतिम गुणवत्ता यादी गुरुवारी रात्री जाहीर केलीय. काही दिवसांपूर्वीच एमपीएससीनं उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यानंतर एमपीएससीनं अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केलीय.
विनाक पाटील राज्यात प्रथम : प्रसिद्ध झालेल्या गुणवत्ता यादीनुसार, विनायक पाटील यानं 622 गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकावलाय. धनंजय वसंत बांगर यानं 608.75 गुण मिळवून द्वितीय, तर गावंडे सौरभ केशवराव यानं 606.75 गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावलाय. एकूण 613 पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. ही भरती प्रक्रिया उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार पदांसाठी होती.
राज्यसेवेची सर्वात मोठी परीक्षा : राज्यसेवेच्या ६१३ पदांसाठी २०२२ मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेतून अंतिम १८०० उमेदवार हे मुलाखतीसाठी निवडण्यात आले होते. या उमेदवारांच्या मुलाखतीचा शेवटचा टप्पा हा गुरूवारी पार पडला. त्याच दिवशी संध्याकाळी फायनल निकाल जाहीर करण्यात आलाय. एमपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवर अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलीय. आतापर्यंतची राज्यसेवेची सर्वात मोठी म्हणजे ६१३ पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आल्यानं निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून होतं.
हे वाचलंत का :
- वडोदरा येथील तलावात शाळकरी मुलांची बोट उलटली, 15 जणांना जल समाधी
- केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईमुळं ठाकरे गटावरील दबाव वाढला, वाचा कोण-कोण आले रडारवर?
- मुंबईला जाणार म्हणजे जाणारच; जरांगे पाटील आंदोलनावर ठाम