महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

MP Supriya Sule : नवले ब्रीजवरील उताराबाबत तांत्रिक अभ्यास होणे गरजेचे-सुप्रिया सुळे - Accident Inspected by MP Supriya Sule

पुण्यातील नवले पुलावर रविवारी रात्री साडे आठच्या सुमारास भीषण अपघात (Navale Bridge Accident In Pune) झाला. या भीषण अपघातामध्ये  47 गाड्यांचे नुकसान झाले आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.

MP Supriya Sule
नवले ब्रीज अपघात

By

Published : Nov 21, 2022, 12:58 PM IST

Updated : Nov 21, 2022, 2:02 PM IST

पुणे : पुण्यातील नवले पुलावर रविवारी रात्री साडे आठच्या सुमारास भीषण अपघात (Navale Bridge Accident In Pune) झाला. या भीषण अपघातामध्ये 47 गाड्यांचे नुकसान झाले आहे. या अपघाताची माहिती मिळताच पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. या अपघातात एकूण 47 गाड्यांचे नुकसान झाले आहे. यात कोणतीही जीवतहानी झालेली नाही. मात्र मोठ्या प्रमाणावर गाड्यांचे नुकसान झाले आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.

नवले ब्रीज अपघात ; खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून पाहणी

सातत्याने अपघात :सुप्रिया ताई म्हणाल्या 2021 मध्ये लोकसभेत या नवले ब्रीजबाबत मी भूमिका मांडली होती. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लक्ष घातले. नॅशनल हायवेने 18 ते 20 गोष्ठी केल्या. महत्त्वाचे म्हणजे या ठिकाणी पुणे महापालिकेने जे सर्व्हिस रोड करायला हवे, ते त्यांनी केलेले नाही. तसेच नॅशनल हायवेला विनंती करण्यात आली आहे की, जे उतार आहे ते आणि जिथे सातत्याने अपघात होत आहे. असे ठिकाण टेक्निकल बाबी आहे. त्यांचा अभ्यास करने गरजेचे आहे. असे यावेळी खासदार सुळे (Navale Bridge Accident Inspected) म्हणाल्या.

अपघाताचे प्रमाण वाढले : हा रोड झिरो अपघात ग्रस्तरोड झाला पाहिजे. यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटून विनंती करण्यात येणार आहे. गेल्या काही महिन्यापासून या ठिकाणी अपघाताचे प्रमाण हे वाढत चालले आहे. यामुळे यावर लवकरच उपाय करायला हवे, असे देखील यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या सुळे (Accident Inspected by MP Supriya Sule) म्हणाल्या.

Last Updated : Nov 21, 2022, 2:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details