पुणे : एक वेळ केलेली चूक ही चूक असते. परंतु ती जर चूक वेळोवेळी करत असतील तर ते जाणीवपूर्वक केलेले विधाने असतात आणि राज्यपाल हे जाणीवपूर्वक करत आहेत, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे ( MP Supriya Sule ) यांनी दिली. आज पुण्यामध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान गांधी भवन स्मारक दिव्यांग मंत्रालय यांच्या विद्यमाने शोध आनंदी जीवनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सुप्रिया सुळे बोलत होत्या.
Governor Controversial Statement : छत्रपतींचा इतिहास आणि महत्त्व कमी करण्याचे पाप भाजपाचे - खासदार सुप्रिया सुळे - Supriya Sule On Governor
महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले व आंबेडकरांचा अपमान आम्ही सहन करणार नाही, असा इशारा आता खासदार सुप्रिया सुळे ( MP Supriya Sule ) यांनी दिलेला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा ( Supriya Sule On Governor Controversial Statement ) त्यांनी निषेध केला.
राज्यपालांना महाराष्ट्रातून परत बोलवा - माझी राष्ट्रपती आणि केंद्र सरकारला हात जोडून विनंती आहे की आता हे पुरे झालं या राज्यपालांना तुम्ही परत बोलवा. महाराष्ट्रामध्ये आम्ही फुले, शाहू, आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान सहन करणार नसल्याचा इशारा दिलेला आहे. छत्रपतीचा इतिहास आणि महत्त्व बदलण्याचे पाप भाजपा वारंवार करते. त्यामुळे सावरकरांच्या वक्तव्यावर आंदोलन करणारे छत्रपतींच्या वक्तव्यावर तेवढ्या आक्रमकपणे आंदोलन करतील, अशी मला अपेक्षाही नाही. मला त्यात आश्चर्यही वाटत नाही, असेही यावेळी सुप्रिया सुळे यांनी म्हटलेला आहे.
असे विधान करणे चुकीचे - मला माहित नाही फडवणीस खोटं बोलतात का? कारण हे वक्तव्य जर खोटे आहे, असे फडवणीस म्हणत असतील तर त्यांनी न्यायालयात जायला पाहिजे. परंतु असे विधान करणे हे चुकीचे असल्याची प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी आज पुण्यात बोलताना म्हणाले की, शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची माफी मागितली, असे सुधांशू त्रिवेदी यांनी कुठेही म्हटले नाही असे विधान केले होते. त्याला आता प्रत्युत्तर म्हणून खासदार सुप्रियाताई सुळे यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे.