महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Bail to Anil Deshmukh : अनिल देशमुख यांना जामीन; पहा काय म्हणाल्या सुप्रिया सुळे - Supriya Sule said in pune

आज खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule ) यांनी अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाली (Bail to Anil Deshmukh) यावर बोलताना म्हणाले की केंद्रातील आणि राज्यातील ईडी सरकार ने वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. तसेच कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सील्लोड महोत्सवाबाबत, रश्मी शुक्ला यांच्या बाबतीत आणि पुण्यातील नवले ब्रीज येथील पाहाणी केली यावर देखिल खासदार सुप्रिया सुळे बोलल्या. ( MP Supriya Sule on Bail to Anil Deshmukh in pune )

MP Supriya Sule on Bail to Anil Deshmukh
खासदार सुप्रिया सुळे अनिल देशमुख यांना जामिनावर

By

Published : Dec 28, 2022, 2:13 PM IST

खासदार सुप्रिया सुळे अनिल देशमुख यांना जामिनावर

पुणे : राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर ( Bail to Anil Deshmukh ) झाली असून ते आज बाहेर येणार आहे. याबाबत खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांना विचारले असता ते म्हणाले की आम्ही सातत्याने सांगत होतो की या ईडी सरकारने खोटे नाटे आरोप केले. केंद्रातील आणि राज्यातील ईडी सरकारने वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे, की 109 वेळा देशमुख यांच्या कुटुंबियांवर रेड केली आहे. यात काहीही सापडल नाही आणि तशी ऑर्डर काल कोर्टाने खुद्द दिली आहे. जे आरोप देशमुख यांच्यावर करण्यात आले होते. त्यात कोणतेही तथ्य नव्हते कोणाच्यातरी बोलण्यावर हे आरोप करण्यात आले होते. जी महाराष्ट्राची संस्कृती नाही ते सुडाच राजकारण अनिल देशमुख यांच्या बाबतीत झाले आहे. अशी शंका असल्याचे सुळे म्हणाले. तसेच सत्यमेव जयते म्हणत सत्य बाहेर आले असल्याचे सुळे यावेळी म्हणाल्या. (MP Supriya Sule on Bail to Anil Deshmukh in pune )


पुण्यातील नवले ब्रीज येथील पाहाणी :आज खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील नवले ब्रीज येथील पाहाणी केली. यावेळी ते बोलत होते. माझी दिल्लीत पुण्यातील नवले ब्रीज बाबत दोन वेळा चर्चा झाली. फुरसुंगी ते सासवड रस्त्याबाबत देखील सविस्तर चर्चा झाली आणि त्यानंतर गडकरी यांनी त्याबाबत सूचना देखील केल्या. या नवले ब्रिजवर त्यानंतर 3 ते 4 बदल हे झालेले आहे. अजूनही काही कामे हे प्रलंबित असून ते लवकरच पूर्ण होतील अस देखील यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या. ( Bail to Anil Deshmukh )

चारही मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे :कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सील्लोड महोत्सवाबाबत सुळे यांना विचारले असता ते म्हणाले, हे दुर्दैवी आहे की या ईडी सरकारचे एक नव्हे दोन नव्हे तर चार चार मंत्र्यांवर आरोप होत आहे. या चारही मंत्र्यांनी राजीनामा द्यावे अशी महाविकास आघाडीची मागणी आहे. ती रस्त्त देखील असल्याचे सुळे यांनी यावेळी सांगितले तसेच या सरकारने आमच्यावर खोटे नाटे आरोप करण्यापेक्षा या चारही मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे अस यावेळी सुळे म्हणाल्या.

जे काही व्हावे ते पारदर्शक आणि खरे व्हावे : रश्मी शुक्ला यांच्या बाबतीत सुप्रिया सुळे यांना विचारले असता ते म्हणाले की, मला वाटते आहे की जे काही व्हावे ते पारदर्शक आणि खरे व्हावे. आमचा कोर्टवर विश्वास आहे. महाराष्ट्राला न्याय दिला पाहिजे. जे खरे आहे ते समोर येणार आहे मी कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत करते, अस देखील यावेळी सुळे म्हणाल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details