पुणे : पुणे महापालिका आयुक्त यांच्याशी मतदार संघातील विविध प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे आल्या होत्या. यावेळी त्या बोलत होत्या. सत्तेचे विकेंद्रीकरण आणि पंचायत राज हे यशवंतराव चव्हाण यांच्यापासून सुरू आहे. यात प्रत्येक गोष्टीत कामाचे विभाजन हे झालेले होते. पण, गेल्या अनेक महिन्यांपासून जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या निवडणुका या घेण्यात याव्या, अशी आम्ही मागणी करत आहोत. पण, ते त्यांच्या स्वार्थासाठी निवडणूक घेत नाही. सर्वसामान्य नागरिकांची कामे होत नाही आणि यात सर्वसामान्य माणूस हा भरडला जात असल्याची टीका यावेळी सुप्रिया सुळे यांनी केली.
सुळेंचे ताशेरे :कालच कसबा आणि चिंचवड येथील पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. यावर सुळे म्हणाल्या की, महाविकास आघाडी सरकारमधील नेते मंडळी बसून यावर निर्णय घेतील. कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे आज बारामती दौऱ्यावर त्या म्हणाल्या की, बारामतीत जे कोणी येतात त्यांचे स्वागतच होणार आहे. देशात मागच्या तीन वर्षांत सर्वाधिक स्टार्टअप हे महाराष्ट्रात झाले आहे. यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक स्टार्टअप झाले आहेत आणि हा केंद्र सरकारचा डाटा आहे. देवेंद्र फडणवीस यांना माझी विनंती आहे की, पुणे जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली आहे. कोयता गँग हे काय प्रकरण आहे हे देखील आता समोर आहे. तसेच चाकणमधून कुठलंही प्रोजेक्ट हे बाहेर जाणार नाही. आनंद महिंद्रा यांच्याशी मी बोलले होते त्यांनी कन्फर्म केले आहे की, महिंद्रा चाकणमध्ये एक्सपेनशन करत आहे आणि हे ऑन रेकॉर्ड आहे, असे देखील यावेळी सुळे म्हणाले.