महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यात एक फुल दोन डाऊटफुल, या राज्यात घाशीराम कोतवालाच राज्य - संजय राऊत

Sanjay Raut On Shinde Fadnavis Pawar : महाराष्ट्रात तीन घाशीराम कोतवाल (Ghashiram Kotwal) राज्य करताय, अशी टीका खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. पुण्यात उद्धव ठाकरे यांचा शिवसेनेचा जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर विविध मान्यवर उपस्थित होते, यावेळी ते बोलत होते.

Sanjay Raut
संजय राऊत

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 9, 2023, 10:49 PM IST

Updated : Dec 10, 2023, 3:28 PM IST

पुणेSanjay Raut On Shinde Fadnavis Pawar : राज्यात एक मुख्यमंत्री आहे तर दोन उपमुख्यमंत्री आहेत. एक फुल दोन डाऊटफुल आहेत. त्यांच्या विषयी कायम आपण डाऊटफुल आहे. एवढा डाऊट कोणावरच नव्हता. सकाळी उठल्यावर चिमटा काढतात की, मी पदावर आहे की नाही. एवढी बदनामी ब्रिटिशांच्या काळात झाली नव्हती जेवढी आज या तिघांनी केलीय. आज या राज्यात घाशीराम कोतवाल (Ghashiram Kotwal) यांच राज्य सुरू आहे, अशी टीका शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलीय.



आम्ही 2024 ला याच शिल्लक सेनेला सत्तेत आणू: यावेळी संजय राऊत म्हणाले की, फडणवीस (Devendra) यांना शिल्लक सेना बघायची असेल तर त्यांनी आता इथ यावं. तुमच्याकडे जे गेले आहेत, तो फक्त कचराच गेला आहे. शिवसेना महासागर आहे आणि त्याला कधीही ओहोटी लागत नाही. फडणवीस, पुण्यात या आणि बघा शिवसेना किती कामाला लागली आहे. आज तुम्ही आम्हाला शिल्लक सेना म्हणत आहे. 2024 नंतर तुम्ही शिल्लक राहणार नाही. आम्ही 2024 लाच शिल्लक सेनेला सत्तेत आणू.



मोदी यांच्यावर टीका: पुढे संजय राऊत म्हणाले की, या सभेने एक गॅरंटी दिली आहे. आज नरेंद्र मोदी खूप गॅरंटी देत आहेत. शिवसेनेची गॅरंटी आहे की, या पुण्यातून 3 शिवसेनेचे आमदार असतील. लोकसभेला भाजपाचा देखील उमेदवार नसणार आहे. कोण आहे मोदी? मी अत्यंत सभ्य माणूस आहे, जी भाषा मला बाळासाहेबांनी शिकवली ती मी बोलतो. या देशात 2024 नंतर पनोती जाणार आहे. या देशाला राज्याला लागलेली पनोती ही दूर होणार आहे. अटल बिहारी वाजपेयी यांनी जेव्हा नरेंद्र मोदी यांना गुजरातच्या मुख्यमंत्री पदावरू काढायला लागलं होतं. तेव्हा त्यांनी बाळासाहेब यांना विचारलं तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं की, मोदींना काढू नका, नाही तर गुजरात जाईल. पण आज संपूर्ण देश म्हणत आहे की मोदी परत आले की देश जाईल.



कुठेही मोदी लाट नव्हती : नुकत्याच झालेल्या पाच राज्याच्या निवडणुकीवर राऊत म्हणाले की, पाच राज्यात निवडणूक झाली. वाटलं की तिथं भाजपाचा पराभव होईल. लोक चिडलेले होते कुठेही मोदी लाट नव्हती पण एव्हीएम उघडलं की कळलं. देशाची एक निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या आणि जो काही निकाल असेल संपूर्ण देश स्वीकारेल. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाबतीत राऊत पुढे म्हणाले की, एकदा खासगीमध्ये पत्रकाराने मोदींना विचारलं की, तुम्ही मूर्ख बनवून पंतप्रधान झाले. तेव्हा ते बोलले की, मी मूर्ख नाही तर देशातील मूर्ख जनतेने मला पंतप्रधन केलं आहे. तसेच ते आज म्हणत आहे की, मोदीची गॅरंटी आहे. गेल्या 10 वर्षात ज्या तुम्ही गॅरंटी दिल्या त्याचं काय झालं? असा प्रश्न यावेळी राऊत यांनी केला.


तर प्रफुल पटेल यांना का विरोध नाही : ललित पाटील बाबत संजय राऊत म्हणाले की, अमली पदार्थ तस्करीमध्ये शिंदे गटाचे दोन मंत्री आहेत. ललित पाटील (Lalit Patil) यांच्याकडून महिन्याला हफ्ते येत होते. इथल्या बालगोपाळांनाही माहीत आहे की ते कोण आहे. दोन दिवसांपासून नागपूर येथील अधिवेशनामध्ये नवाब मलिक यांच्या बाबतीत जे प्रकरण सुरू आहे, त्यावर राऊत म्हणाले की, आज प्रफुल पटेल यांचं स्वागत कोण करत आहे. इकबाल मिर्ची कोण आहे, तो मुंबईच्या बॉम्ब स्फोटाचा मुख्य सूत्रधार आहे. याच्याकडून प्रफुल पटेल यांनी व्यवहार केला. याच मिर्चीचा काय भोपळा झाला काय? प्रफुल पटेल यांचं पंतप्रधान आणि अमित शाह यांनी स्वागत केलं. नवाब मलिक यांना विरोध आहे. तर प्रफुल पटेल यांना का विरोध करत नाही. तुम्ही आम्हाला कायदा शिकवता तुम्ही तरी कायद्याचं पालन करतात का? असा प्रश्न देखील राऊत यांनी केला.

पुणे शुद्ध झालं आहे.. त्याचं नाव नको : आज जे निवडणूक आयोग करत आहे, ते यांच्या म्हण्यावरून करत आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला विचारून काय पक्ष सुरू केला होता काय? तेव्हा काय निवडणूक आयोगाचा जन्म तरी झाला होता का. शिंदे गटाने भरत गोगावले यांची निवड बेकायदेशीर केली आहे. न्यायालय सांगत आहे की रीतसर सुनावणी घ्या. "सर्वोच्च न्यायालयाने या आमदारांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्यासाठी जल्लादाचं काम विधानसभा अध्यक्षांना करायचं आहे," असा दावा राऊत यांनी केला. तो त्यांना घटनेने दिलेला अधिकार आहे. पण ते असं करायला तयार नाहीत. मी शिवसेनेसाठी जगेल आणि शिवसेनेसाठी मरेल असं देखील यावेळी राऊत म्हणाले. तसेच विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या बाबतीत राऊत म्हणाले की, त्यांचं नाव नका घेऊ त्या आज विलन ताई आहेत. पुणे शुद्ध झालं आहे. त्याचं नाव नका घेऊ असं देखील राऊत म्हणाले.


तर आमच्याकडे फक्त संजय राऊत आहे : यावेळी सुषमा अंधारे (Sushma andhare) म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलं होत की, शिल्लक सेना आहे तर त्यांना मी नेहेमी महाप्रबोधन यात्रेच्या वेळी म्हटलं होत की, येऊन बघा. तुमच्याकडे भुजबळ, प्रफुल पटेल, भावना गवळी आहे तर आमच्याकडे फक्त संजय राऊत आहेत. फडणवीस यांनी जे पत्रात लिहिलं की, सत्ता येते आणि जाते देश महत्त्वाचा आहे हे वाक्य ऐकून हसू आलं. ती भाजपा वेगळी होती आणि आत्ताची भाजपा वेगळी आहे. वाजपेयी यांची ती भाजपा राहिलेली नाही. मुंग्या वारूळ बांधतात आणि मग ते बांधल्यावर ते राहात नाही तसं भाजपाच झालं आहे. सत्तेसाठी देवा भाऊ यांनी राज्याचं राजकारण आस्थिर ठेवलं आणि यामुळे उद्योग बाहेर जाऊ लागले. जे पोट भरायला येत होते त्यांना आत्ता काम मिळत नाही.

जाणीवपूर्वक मलिक यांचा विषय चर्चेला आणला गेला : अधिवेशनावर करोडो रुपये खर्च होत आहे आणि नवाब मलिक यांच्यावर चर्चा होत आहे. मलिक सत्ताधारी यांच्या बरोबर बसले तर ते म्हणाले की ते कसे बसले माहीत नाही.आपल्यावर डाव उलटत आहे. हे लक्षात आल्यावर लगेच पत्र लिहिलं. इंटरनेट आणि व्हॉट्सॲपच्या जमान्यात जिथं शेजारी शेजारी बसलेले असताना पत्र लिहिलं जात आहे. जाणीवपूर्वक मलिक यांचा विषय चर्चेला आणला गेला. दुष्काळ, शेतकरी यांच्या प्रश्नावर चर्चा न करता फक्त मलिक यांच्यावर चर्चा केली गेली.ललित पाटील प्रकरणात डॉ.नरसाळे देवकाते यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे.देवकाते बोलले की मला बळीच बकरा केलं जातं आहे.फडणवीस साहेब वरचा नेक्सेस कधी बाहेर येणार आहे. डॉ.संजीव ठाकूर यांना कधी अटक होणार आहे.यावर फडणवीस यांनी चर्चा केली पाहिजे.अस यावेळी अंधारे म्हणाल्या.

हेही वाचा -

  1. 'हा तर ईव्हीएम आदेश', 4 राज्यांच्या निकालावर बोलताना संजय राऊत भडकले
  2. संजय राऊतांना जामीन; दादा भुसे म्हणाले 'दलाल माणूस'
  3. कुठे काय मुरलं? भाजपाच्या नैतिकतेचं ऑडिट व्हायला हवं- खासदार संजय राऊत
Last Updated : Dec 10, 2023, 3:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details