पुणे - कायम वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असलेले संभाजी भिडे यांनी रविवारी सांगलीमध्ये गौतम बुद्धांवर अशाच प्रकारे वादग्रस्त विधान केले. यावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी प्रत्युत्तर दिले. बुद्ध आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे महत्त्व सांगताना ते म्हणाले, जगाचा संसार चालवण्यासाठी गौतम बुद्ध जेवढे महत्वाचे आहेत तेवढेच महत्वाचे छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराज आहेत. बुद्ध अध्यात्म, तर शिवाजी महाराज शौर्याचे सर्वोच्च बिंदू असल्याचे संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे. पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले असताना त्यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत आपले मत व्यक्त केले.
हेही वाचा - पंतप्रधान चुकीचं बोलले.. भारताने जगाला बुद्ध दिला पण उपयोगाचा नाही - संभाजी भिडे
शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी रविवारी सांगली येथे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला. मोदींनी संयुक्त राष्ट्र संघाच्या कार्यक्रमात बोलताना 'युद्ध नव्हे तर जगाला बुद्धाची गरज आहे' असे उद्गार केले होते.