पुणे - आमदार संग्राम थोपटे यांना मी अनेक वर्षांपासून ओळखतो. त्यांना एखाद्या खात्याची जबाबदारी द्यायला हवी होती. पण, त्यांना मंत्रीपदापासून डावलण्यात आले. त्यांना जर काँग्रेसचे विचार पटत नसतील तर त्यांच्यासाठी भाजपची दारे उघडी आहेत, असे खासदार गिरीश बापट म्हणाले.
बोलताना खासदार गिरीश बापट
मंगळवारी (दि. 31 डिसें) आमदार संग्राम थोपटे यांना मंत्रीपद न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त करत पुणे येथील काँग्रेस कार्यालयाची तोडफोड केली. त्यानंतर खासदार बापट प्रतिक्रिया देत होते.
हेही वाचा - ज्यांनी काँग्रेस भवनाची तोडफोड केली, त्यांना त्याची किंमत मोजावीच लागेल - रमेश बागवे
पुढे ते म्हणाले, अनंतराव थोपटे हे त्यांच्या पक्षाशी अत्यंत एकनिष्ट आहेत. त्यांना पाडण्याचा प्रयोग त्यांच्याच पक्षातील काहींनी केला होता. आता संग्राम थोपटे यांसोबतही असेच होत आहे. जर थोपटेंना काँग्रेसचे विचार पटत नसतील तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि भाजपमध्ये प्रवेश करत निवडणूक लढवावी त्यांना आम्ही निवडूण आणू, असेही खासदार गिरीश बापट म्हणाले.
हेही वाचा - कोरेगाव भीमा शौर्य दिन : विजयस्तंभाला विद्युत रोषणाई, फटाक्यांच्या आतषबाजीने अभिवादन