पुणे - जगभरात कोरोना विषाणूच्या संकटाने थैमान घातले आहे. आपल्या देशातही दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. या संकटाच्या काळात रुग्णांवर यशस्वी उपचार करताना आर्थिकदृष्ट्या कमतरता राहू नये यासाठी खासदार गिरीश बापट यांनी आपल्या खासदार निधीतून 50 लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे त्यांनी आज याबाबतचे पत्र सुपूर्त केले.
खासदार गिरीश बापट यांच्याकडून कोरोना उपायांसाठी 50 लाखांचा निधी - aid
एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी सातत्याने प्रशासनाच्या संपर्कात आहे. दररोज प्रशासनाकडून माहिती घेत आहे. सध्या जरी परिस्थिती नियंत्रणात असली तरी ह्या आपत्कालीन स्थितीसाठी प्रशासन सज्ज आहे', असेही बापट म्हणाले.
खासदारपदाचे एक महिन्याचे वेतनही त्यांनी पक्षाला या उपायांसाठी दिले आहे. यावेळी भाजप युवा प्रदेश उपाध्यक्षा स्वरदा बापट, कॅटलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील माने उपस्थित होते. 'कोरोना या महाभयंकर आजारामुळे जग थांबले आहे. जगभरात दररोज हजारो जण या आजारामुळे मृत्युमुखी पडत आहेत. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुरदृष्टीमुळे तसेच राज्य सरकारच्या खबरदारीतून हा आजार आटोक्यात राहण्यासाठी प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न चालू आहेत. या जीवघेण्या आजारातून सावरण्यासाठी मोदींनी आवाहन केल्याने अनेक मदतीचे हात पुढे येत आहेत. एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी सातत्याने प्रशासनाच्या संपर्कात आहे. दररोज प्रशासनाकडून माहिती घेत आहे. सध्या जरी परिस्थिती नियंत्रणात असली तरी ह्या आपत्कालीन स्थितीसाठी प्रशासन सज्ज आहे', असेही बापट म्हणाले.
वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी मास्क तसेच इतर आवश्यक साधने, रुग्णांसाठी आवश्यकता भासल्यास व्हेंटिलेटर खरेदी करण्यात येणार आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता भासणार आहे. यासाठी मी माझ्या खासदार निधीतून 50 लाखाचा निधी देत आहे. संकटातून सावरण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने मदत करण्याची आवश्यकता आहे, असे आवाहनही खासदार बापट यांनी केले.