पुणे - मेगाभरती सुरु होण्याआधिपासुनच बारामतीला लक्ष्य केले असुन ज्यांना पक्षांतर करायचंय त्यांच्यासाठी भाजपाचे दरवाजे नेहमीच उघडे आहेत. आधीच्या पक्षात जे कंटाळलेले आहेत. आधीच्या पक्ष नेतृत्वावर ज्यांचा विश्वास राहिला नाही ते लोक सध्या भाजपात येत असल्याचे वक्तव्य पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी केले आहे. राजगुरुनगर येथे भाजप तालुकाध्यक्ष अतुल देशमुख यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमा दरम्यान माध्यमांशी बोलताना बापटांनी बारामतीला लक्ष्य केले.
मेगाभरती सुरु होण्याआधीपासुनच बारामती लक्ष्य; खासदार गिरीष बापट विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर युती संदर्भात भाजप व शिवसेना पक्षश्रेष्ठी बैठका घेत आहेत. केंद्रातुनही या संदर्भात बारकाईने लक्ष दिले जात असून दोघांमध्ये समजोता करुनच युती केली जाईल. दोघांमध्ये कुठेही कटूता येणार नाही आणि येणाऱ्या विधानसभेत राज्यात पुन्हा एकदा पहिल्या पेक्षा जास्त जागा युतीच्या सरकार मिळणार असल्याचा विश्वास बापटांनी व्यक्त केला.
हे ही वाचा -शिवसेनेची यादी आपणच तयार करा, उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला
खेड-आळंदी विधानसभा मतदार संघात गेल्या पाच वर्षापासुन विकासकामांच्या जोरावर भाजपने वेगळे स्थान निर्माण केले असुन गावागावांत चांगला जनसंपर्क तयार केला आहे. राजगुरुनगर, आळंदी या दोन नगरपरिषद, दोन जिल्हा परिषद गट, पंचायत समिती अशी एक हाती सत्ता भाजपने मिळवली असुन या तालुक्यात याआधी तुम्हाला विकासकामांसाठी बारामतीला जावे लागत होते. मात्र, आता परिस्थिती बदलत आहे. आजपर्यंत भाजपच्या माध्यमातून खुप विकासकामे झाली असून पुढील काळातही खुप कामे करायची आहेत. त्यामुळे येणा-या विधानसभेला हि जागा भाजपला सोडण्यासाठी तुमच्या मनात जे आहे त्याचा विचार पक्षश्रेष्ठी करत असल्याचा विश्वास गिरीश बापटांनी व्यक्त केला. ते राजगुरुनगर येथे भाजपा तालुकाध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
हे ही वाचा -सभापतीपद टिकवण्यासाठी रामराजेंची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी; शिवबंधनात अडकणार