पुणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी रविवारी दुपारी बारा जोतिलिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकरचे दर्शन घेतले. यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार दिलीप वळसे पाटील व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकसभेच्या आखाड्यात अमोल् कोल्हे यांनी शिवसेनेच्या आढळराव पाटलांचा पराभव केला होता.
नवनिर्वाचित खासदार अमोल कोल्हेंनी घेतले श्री क्षेत्र भीमाशंकरचे दर्शन; विकासकामांचा घेतला आढावा - खासदार डॉ. अमोल कोल्हे
देवस्थानच्यावतीने डॉ. कोल्हे यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर भीमाशंकर परिसर विकास आराखडयाच्या सुरू असलेल्या कामाची व भीमा नदी उगमस्थान येथील विकासकामांची त्यांनी पाहणी केली.
नवनिर्वाचित खासदार अमोल कोल्हेंनी घेतले श्री क्षेत्र भीमाशंकरचे दर्शन
देवस्थानच्यावतीने डॉ. कोल्हे यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर भीमाशंकर परिसर विकास आराखडयाच्या सुरू असलेल्या कामाची व भीमा नदी उगमस्थान येथील विकासकामांची त्यांनी पाहणी केली. यासोबत स्थानिक आदिवासींच्या या परिसरातील अडचणी समजून घेतल्या.
दरम्यान, डॉ. कोल्हे गेल्या तीन दिवसांपासुन जुन्नर आंबेगाव तालुक्यातील गावभेट दौऱयावर असून दुष्काळी परिस्थितीचाही आढावा घेत आहेत.