महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जुन्नर तालुक्यात राष्ट्रवादीच्या 'अमोल-अतुल' जोडीकडून शेतीच्या नुकसानीची पाहणी - डॉ अमोल कोल्हे जुन्नर तालुका दौरा

खासदार डॉ अमोल कोल्हे व आमदार अतुल बेनके या खासदार-आमदार जोडीने ग्रामस्थांसमवेत शेतांच्या बांधावर जाऊन दौरा केला. त्यानंतर परतीच्या पावसाने द्राक्ष बागांचे नुकसान होत असल्याने याची गंभीर दखल घेऊन त्वरीत पंचनामे करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले.

अमोल-अतुल

By

Published : Oct 28, 2019, 3:08 PM IST

Updated : Oct 28, 2019, 7:26 PM IST

पुणे - विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे जिल्ह्यातील जुन्नर आंबेगाव, खेड शिरूर तालुक्यात मोठे यश मिळाले. यानंतर खासदार व आमदार कामाला लागले आहेत. यातच सोमवारी जुन्नर तालुक्यात परतीच्या पावसाने द्राक्ष बागेंचे मोठे नुकसान होत आहे. याबाबत खासदार डॉ अमोल कोल्हे व आमदार अतुल बेनके या खासदार-आमदार जोडीने ग्रामस्थांसमवेत शेतांच्या बांधावर जाऊन दौरा केला. त्यानंतर परतीच्या पावसाने द्राक्ष बागांचे नुकसान होत असल्याने याची गंभीर दखल घेऊन त्वरीत पंचनामे करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले.

'अमोल-अतुल' जोडीकडून शेतीच्या नुकसानीची पाहणी

जुन्नर तालुक्यातील बालपणाची जोडी म्हणुन अमोल-अतुलची जोडी संपुर्ण तालुक्याला परिचीत आहे. आता ही जोडी खासदार-आमदार म्हणून जनतेच्या कामात उतरली असून एक केंद्रातून तर एक राज्यातून नेतृत्व करणार आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ले शिवनेरीतील नागरिकांमध्ये अमोल-अतुल जोडीच्या रूपातून आशेचा किरण पुढे आला आहे.

हेही वाचा - ओझरमध्ये पहाटेच्या सुमारास दोन बिबट्यांचे आगमन, थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

खासदार डॉ. कोल्हे व आमदार अतुल बेनके यांनी सोमवार सकाळपासुनच जुन्नर तालुक्यात दौरा सुरू केला. यावेळी त्यांनी शेतीच्या नुकसानीची पहाणी केली असून शेतकऱ्यांच्या अडीअडचणीही समजून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.

हेही वाचा - सहा वर्षीय मुलीला बाळाचा सांभाळ करायला सांगून महिलेची आत्महत्या.. पतीच्या जाचामुळे उचलले पाऊल

Last Updated : Oct 28, 2019, 7:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details