पुणे - राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्या तिन नियोजित सभा पिंपरी-चिंचवडमध्ये होणार होत्या. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेचे कारण देत उड्डाणाची परवानगी नाकारल्यामुळे ऐनवेळी कोल्हे या सभांना पोहचू शकले नाहीत. परंतु त्यांनी हार न मानता सभेला उपस्थित जनतेशी संवाद साधाण्यासाठी चक्क मोबाईलचा आधार घेतला.
थेट प्रक्षेपण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र तो साध्य झाला नाही. अमोल कोल्हे यांनी अखेर मोबाईलवरून पिंपरी-चिंचवडमधील जनतेशी संवाद साधला. त्यांच्या उपस्थितीत सभा व्हावी यासाठी अमोल कोल्हे यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. औरंगाबाद येथे जाऊन चार्टड विमानाने पुणे येथे येण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. मात्र, तेथे परवानगी नाकारण्यात आली, असं खुद्द अमोल कोल्हे यांनी सांगितले आहे. अखेर पुण्याच्या दिशेने येत असताना चांदवड नाशिक येथे रस्त्याच्या कडेला गाडी थांबवून समोर श्रोता नसताना त्यांनी पिंपरी-चिंचवड मधील जनतेशी समवाद साधला. यावेळी त्यांनी सहा ते सात मिनिटे भाषण केले.