पुणे - दिल्लीतील दंगल हे केंद्रीय गृहमंत्रालयाचे अपयश आहे. देशासाठी एखादा निर्णय घेतल्यानंतर त्यावर काही जनता नाराज असेल आणि त्यांच्या मनात असुरक्षिततेची भावना असेल, तर त्याचे निराकरण करणे, हे केंद्र सरकारचे कर्तव्य आहे. असे असतानाही या सर्व गोष्टी दडपण्याचा प्रयत्न सुरू असेल आणि त्यातून काही अनुचित गोष्टी घडत असतील, तर याची संपूर्ण जबाबदारी गृहमंत्रालयाने घ्यावी आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, असे खासदार अमोल कोल्हे म्हणाले. आज पुण्यात ते बोलत होते.
...तर दिल्लीतील हिंसाचाराची जबाबदारी घेवून गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा - खासदार कोल्हे - दिल्ली हिंसाचार
खासदार अमोल कोल्हे यांनी दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेबद्दल गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. ते म्हणाले, सरकारने देशासाठी एखादा निर्णय घेतल्यानंतर जनतेच्या मनात असुरक्षिततेची भावना असेल, तर केंद्र सरकारने त्याचे निराकरण करायला पाहिजे.

खासदार अमोल कोल्हे
...तर गृहमंत्रालयाने जबाबदारी घेवून राजीनामा द्यावा - खासदार अमोल कोल्हे
खेडचे विमानतळ दुर्दैवी धोरणामुळे आणि तत्कालीन लोकप्रतिनिधींच्या भूमीकेमुळे गेले आहे. मात्र, चाकण एमआयडीसीचा विचार करता किमान देशाअंतर्गत (डोमेस्टीक) सेवा पुरवण्यासाठी विमानतळ होणे गरजेचे आहे. नाशिक रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. खेड घाट बायपासचे कामही काही महिन्यात पूर्ण होत आहे. याशिवाय इतर चार बायपासची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून पावसाळ्यानंतर काम सुरू होईल. आगामी दीड ते दोन वर्षात पुणे-नाशिक रस्त्याचे काम पूर्ण होईल. अष्टविनायक रस्ता पूर्ण करण्यासाठीही आम्ही पाठपुरावा करत आहोत, असे खासदार कोल्हे यांनी सांगितले.
पुणे-नाशिक रेल्वे मार्गासाठी केंद्रीय पातळीवर तीव्र हालचाली सुरू आहेत. ते लवकरच पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू, असेही आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
मालिकेमध्ये काय दाखवायचे आणि काय गाळायचे हा त्या वाहिनीचा अधिकार असतो. मालिकेचा सकारात्मक परिणाम संभाजी महाराजांचा इतिहास मुलांपर्यंत पोहोचवत आहे, ही खूप मोठी गोष्ट असल्याचेही ते म्हणाले.