महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साकुर्डी घाटातील अपघातग्रस्तांची खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांनी घेतली भेट - Shivajirao Adhalrao Patil

खेड तालुक्यातील साकुर्डी घाटात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास पिकअप गाडी उलटून झालेल्या अपघातात २७ जण जखमी झाले. या अपघातात जखमी झालेल्यांची शिरुरचे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी भेट घेतली आहे.

अपघातग्रस्तांची पाहणी करतांना आढळराव पाटील

By

Published : Mar 27, 2019, 8:50 PM IST

पुणे - खेड तालुक्यातील साकुर्डी घाटात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास पिकअप गाडी उलटून झालेल्या अपघातात २७ जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. शिरुरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांनी या अपघातग्रस्तांची भेट घेतली आहे. जखमीं रुग्णांवर चांडोली ग्रामीण रुग्णालय व पिंपरी-चिंचवड येथील वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णांवर योग्य उपचार मिळावेत यासाठी डॉक्टरांना आदेशही देण्यात आल्याचे आढळरावांनी सांगितले.

अपघातग्रस्तांची पाहणी करतांना आढळराव पाटील

काही दिवसांपूर्वी आंबेगाव तालुक्यातील साकोरी येथे पाच वर्षाच्या मुलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता तर मंगळवारी झालेल्या खेड तालुक्यातील साकुर्डी घाटात २७ जण जखमी व एकाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे अशा दुर्दैवी घटना रोखण्यासाठी आगामी काळात प्रशासकीय यंत्रणेकडून प्रयत्न करण्याची गरज असल्याचे आढळराव-पाटलांनी म्हटले.

ABOUT THE AUTHOR

...view details