पिंपरी-चिंचवड (पुणे) - शहरात चालते फिरते मंगल कार्यालयाची संकल्पना पुढे आल्याच पाहायला मिळत आहे. शहरातील भोसरी परिसरात राहणाऱ्या दयानंद दरेकर यांनी ही हटके संकल्पना प्रत्यक्षात साकारली आहे. दरेकर त्यांनी साकारलेल्या मंगल कार्यलयात विद्यूत रोषणाई, वातानुकूलित हॉल, साउंड सिस्टिम सुविधा देण्यात आल्या आहेत. तब्बल 50 लाख खर्च करून त्यांनी मंगल कार्यालयाच स्वप्न पूर्ण केले आहे.
दरेकर 20 वर्ष झाले करत आहेत मंडप डेकोरेशनचा व्यवसाय
दयानंद दरेकर हे गेली वीस वर्षे झाले मंडप डेकोरेशनचा व्यवसाय करतात. व्यवसाय करत असताना हॉटेल किंवा मंगल कार्यालयाचा खर्च सर्व सामान्य नागरिकांना झेपत नसल्याने मंडप टाकून विवाह समारंभ, वाढदिवस किंवा इतर कार्यक्रम करतो. याचा विचार करून वेगळी संकल्पना करण्याचे दरेकर यांनी ठरवले होते.
तीन महिन्यात झाले मंगल कार्यालय तयार; 50 लाख आला खर्च
तीन महिने परिश्रम घेऊन आणि 50 लाखांपेक्षा अधिक खर्च करून चालते फिरते मंगल कार्यालय तयार केले आहे. ट्रकवर उभारण्यात आलेले मंगल कार्यालय सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. आपण म्हणाल त्या ठिकाणी फिरते कार्यालय येऊ शकते. अनेकदा मंडप व्यवसाय करत असताना मांडव घालताना अडचणी येत होत्या.मात्र, थेट मंगल कार्यालयाच दारात उभे करू शकतो असे दयानंद दरेकर यांनी सांगितले आहे. ट्रकवरील मंगल कार्यलयात दीडशे ते दोनशे व्यक्तींची बसण्याची क्षमता आहे.
50 हजार रुपयांमध्ये उपलब्ध होणार चालते फिरते मंगल कार्यालय
अवघ्या 50 हजार रुपयांमध्ये फिरते मंगल कार्यालय उपलब्ध होणार आहे. यात आचारी, बँड, ब्राह्मण, केटरर्स (वाडपी, जेवण नाही), असे पॅकेज असणार आहे. दरेकर यांना अनेक ऑर्डर येत असून संबंधित व्यक्तीच्या घरापुढेच आता मंगल कार्यालय येऊन ठेपत आहे.
हेही वाचा -पुण्यातील 'या' हॉटेलमध्ये 'मूकबधिर' कर्मचारी देताहेत ग्राहक सेवा