महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Video: इंद्रायणी काठावर सोडले तीन दिवसांच्या चिमुकलीला; जन्मदात्री सीसीटीव्हीत कैद - आळंदी नदी घाट

देवाच्या आळंदीतील इंद्रायणी नदीच्या पवित्र घाटावर तीन दिवसाच्या चिमुकल्या मुलीला जन्मदात्रीने सोडल्याची घटना घडली आहे. देवाच्या दारात मुलगी नकोशी झाली म्हणून पवित्र मानल्या जाणाऱ्या इंद्रायणी घाटावर या चिमुकल्या मुलीला सोडले हा सर्व प्रकार घाटावरील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.

इंद्रायणी घाटावर तीन दिवसांच्या चिमुकलीला जन्मदात्रीनेच सोडून दिले

By

Published : Nov 17, 2019, 3:17 PM IST

पुणे - देवाच्या आळंदीतील इंद्रायणी नदीच्या पवित्र घाटावर तीन दिवसाच्या चिमुकल्या मुलीला जन्मदात्रीनेच सोडल्याची घटना समोर आली आहे. देवाच्या दारात मुलगी नकोशी झाली म्हणून पवित्र मानल्या जाणाऱ्या इंद्रायणी घाटावर या चिमुकल्या मुलीला सोडले, हा सर्व प्रकार घाटावरील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.

Video: इंद्रायणी घाटावर तीन दिवसांच्या चिमुकलीला जन्मदात्रीनेच सोडून दिले

हेही वाचा - दौंड : मनमानी पद्धतीने रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल

वारकऱ्यांचे श्रद्धास्थान म्हणून आळंदीची जगभरात एक वेगळी ओळख आहे. आणि आता याच देवाच्या आळंदीत मुलगी नकोशी झाल्याने सोडून दिल्याची घटना घडल्याने वारकऱ्यांच्या पंढरीत हळहळ व्यक्त केली जात आहे. तीन दिवसांनंतर देवाच्या आळंदी भक्तीचा महासागर म्हणून ओळख असलेला संजीवन समाधी सोहळा आळंदीतील इंद्रायणी घाटावर संपन्न होणार आहे. या संजीवन सोहळ्यातून प्रत्येकजण जगण्याचा एक नवा मंत्र घेऊन जात असतो. त्याच घाटावर आज चिमुकल्या मुलीलाच जन्मदात्यांनी सोडून दिल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

दरम्यान 'बेटी बचाओ बेटी पढाओ'चे नारे दिले जातात तर दुसरीकडे माऊलीच्या अभंगवाणीतून मुलीची मोठी महिमा सांगितली जाते. मात्र, याच प्रबोधनाकडे आजच्या युगातही दुर्लक्ष करुन या सुंदर जगात वाऱ्यावर सोडण्याचे, असे प्रकार जन्मदात्यांच्याच हातून घडत आहे.

हेही वाचा - दिवसा हॉटेलमध्ये वेटर तर रात्री दुचाकी चोर... अखेर पोलिसच ठरले शिरजोर!

ABOUT THE AUTHOR

...view details