महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

माता न तू वैरीणी... पुण्यात सहा वर्षीय मुलीचा भोसकून आईनेच केला खून - Dattawadi Area Pune

स्वत:च्या मुलीच्या हाताची नस कापून जन्मदात्र्या आईनेच खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील दत्तवाडी परिसरात आज (सोमवारी) दुपारच्या सुमारास ही घटना घडली.

दत्तवाडी पोलीस ठाणे, पुणे

By

Published : Sep 9, 2019, 6:20 PM IST

Updated : Sep 9, 2019, 11:13 PM IST

पुणे - शहरातील दत्तवाडी परिसरात मानसिक संतुलन बिघडलेल्या एका मातेने स्वतःच्याच सहा वर्षीय मुलीचा दोन्ही हाताच्या नस कापून निर्घृण खून केला. ही धक्कादायक घटना सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेनंतर दत्तवाडी पोलिसांनी या निर्दयी मातेला ताब्यात घेतले आणि तिला अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अक्षरा अमित पाटील (वय 6) असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे. तर श्वेता पाटील (वय 36) हिला पोलिसांनी अटक केली आहे. मृत अक्षरा पाटील हिचा जन्म अमेरिकेत झाला होता. ती अमेरिकेची नागरिक आहे. त्यामुळे अमेरिकन दुतावासाला याची माहिती देण्यात येणार आहे, असे पोलिसांनी सांगितले.

जन्मदात्रीनेच घेतला सहा वर्षीय मुलीचा जीव

हेही वाचा - 'कपड्यावर कपडे का वाळत घातले' विचारत ठाण्यात १७ वर्षीय तरुणाचा खून

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी श्वेता पाटील हिचा पती संगणक अभियंता आहे. दहा वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले आहे. इतकी वर्षे ते अमेरिकेतच वास्तव्यास होते. अक्षरा हिचा जन्मसुद्धा अमेरिकेतच झाला. चार वर्षांपूर्वी ते भारतात आले होते. तर परत नोकरीनिमित्त ते अमेरिकेत जाणार होते. त्यासाठी व्हिसाच्या कामानिमित्त तिघांनाही सोमवारी चेन्नईला येथे जायचे होते. त्यापूर्वीच ही घटना घडली. तर श्वेता हिला अमेरिकेत जायचे नव्हते. त्यामुळे घरातील सर्व तिला समजून सांगत होते. दुपारी त्या दत्तवाडी परिसरातील नातेवाईकांच्या घरी गेल्या होत्या. तेथे गेल्यानंतर श्वेता हिने चिमुकल्या अक्षरा हिला स्वयंपाकघरात नेऊन दार बंद केले आणि तिच्या दोन्ही हातांवर चाकूने वार केले. यात अतिरक्तस्त्राव झाल्याने चिमुरड्या अक्षराचा मृत्यू झाला.

हेही वाचा -'कपड्यावर कपडे का वाळत घातले' विचारत ठाण्यात १७ वर्षीय तरुणाचा खून

श्वेता यांच्या आई-वडिलांचे कॅन्सरने निधन झाले होते. त्यामुळे माझ्या मनात भीती होती. माझ्यानंतर माझ्या मुलीचे काय होणार या विचारानेच मुलीचे आयुष्य संपवले, असे श्वेता यांचे म्हणणे आहे. कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या चार वर्षांपासून श्वेता यांच्यावर मानसोपचार तज्ज्ञांचे उपचार सुरू आहेत.

Last Updated : Sep 9, 2019, 11:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details