महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Pune Crime News: धक्कादायक! आईनेच घेतला पोटच्या मुलीचा जीव; चाकूने भोसकून केला खून

दिवसेंदिवस गुन्हेगारी, खून, चोरी या घटना वाढत चालल्या आहेत. पुण्यात सोमवारी अशीच एक धक्कादायक घटना घडली. आईने आपल्या चार वर्षाच्या मुलीचा खून केला आहे.

Pune Crime News
आईनेच घेतला पोटच्या मुलीचा जीव

By

Published : Mar 28, 2023, 7:39 AM IST

पुणे : एकीकडे शहरात कोयता गँगकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर दुसरीकडे विविध गुन्हे घडत आहे. अश्यातच पुण्यातील हडपसर येथील सिद्धिविनायक दुर्वांकुर सोसायटी ससाणे नगर येथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे. आईने चार वर्षीय मुलीचा चाकूने भोसकून खून केला आहे.


खूनाचे कारण अस्पष्ट : वैष्णवी महेश वाडेर (वय अंदाजे 4 वर्ष) असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी तिची आई कल्पी हिला ताब्यात घेतले आहे. सोमवारी रात्री सव्वा नऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. आईने हा खून कोणत्या कारणातून केला गेला, हे मात्र अजून समजू शकलेले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी महीला ही तिच्या मुलीसोबत एकटीच राहत होती. हडपसर येथील सिद्धिविनायक दुर्वांकुर सोसायटी ससाणे नगर येथे आई आणि तिची मुलगी ही 23 दिवसापूर्वी तेथे राहण्यास आली होती.

मुलीचा मृतदेह दिसून आला : आरोपी महिला ही बेकरी प्रॉडक्ट विक्रीचा व्यवसाय करत होती. सोमवारी ती भाड्याचे घर खाली करणार होती. त्यामुळे घरमालक तेथे गेले होते. त्यावेळी आरोपी महिलेने दरवाजा आतून बंद करून घेतला होता. शेजारच्यांनी महिलेला दरवाजा उघडण्यास सांगितले. घरमालक व शेजाऱ्यांनी घरात जाऊन पाहिले असता मुलीचा मृतदेह दिसून आला. त्यांनी तत्काळ याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मुलीचा खून करणाऱ्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

गुन्हेगारीच्या घटना : राज्यातील गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढत चालला आहे. खून तसेच लैंगिक अत्याचाराच्या घटनांचे प्रमाण वाढत आहे. मागील आठवड्यात वडिलांनी मुलीचे लैंगिक शोषण केल्याची घटना समोर आली होती. काही दिवसांपूर्वी नांदेड रेल्वे स्टेशनव तपोवन एक्सप्रेसमध्ये टॉयलेटमध्ये महिलेचा मृतदेह आढळला होता. या संदर्भात घातपाताची शक्यता वर्तविण्यात येत होती. विरारमध्ये 20 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली होती.

हेही वाचा : Nanded Crime News: खळबळजनक! तपोवन एक्सप्रेसच्या टॉयलेटमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; घातपाताची शक्यता

ABOUT THE AUTHOR

...view details