पुणे- कोरेगाव भीमा येथील भीमा नदीत उडी मारून एका मातेने चिमुकल्या मुलीला कंबरेला बांधून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी सायंकाळी घडली. आज दुपारी मायलेकींचा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. सपना कसबे असे मृत महिलेचे नाव आहे.
चिमुकलीला कमरेला बांधून आईची भीमा नदीत आत्महत्या; परिसरात हळहळ - Shikrapur Police Station Pune
शिरुर तालुक्यातील सणसवाडी येथील सपना कसबे या 25 वर्षीय विवाहितेने आपल्या चिमुकल्या मुलीला ओढणीने कंबरेला बांधून भीमा नदीत उडी मारली. स्थानिक नागरिकांकडून मायलेकींचा शोध सुरू होता. मात्र आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास मायलेकीचे मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळले.
मृत आई आणि चिमुकली
शिरुर तालुक्यातील सणसवाडी येथील सपना कसबे या 25 वर्षीय विवाहितेने रविवारी दुपारच्या सुमारासआपल्या चिमुकल्या मुलीला ओढणीने कंबरेला बांधून भीमा नदीत उडी मारली होती. स्थानिक नागरिकांकडून मायलेकींचा शोध सुरू होता. मात्र आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास मायलेकीचे मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळले. मात्र मायलेकींच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. शिरुर तालुक्यातील सणसवाडी येथील मायलेकींनी नदीपात्रात उडी मारून आत्महत्येसारखे पाऊल उचलल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.